नवी दिल्ली : यंदा करपात्र उत्पन्न (Taxable Income) आणि उत्पन्नावर कर सवलतीच्या (Tax Exemptions) चर्चा आतापासूनच झडत आहेत. कर संकलनातून केंद्र अथवा राज्य सरकारला विविध कल्याणकारी योजना राबविता येतात. महसूलाच्या आधारे कारभाराचा गाडा हाकता येतो. त्यामुळे कर भरुन (Income Tax) आपण देशाच्या विकासात एकप्रकारे हातभारच लावत असतो. जर तुमचे उत्पन्न, कमाई कराच्या परिघात येत असेल तर तुम्हाला कर द्यावा लागतो. त्यासाठी विविध उत्पन्न श्रेणी (Tax Slab) तयार करण्यात आली आहे. करपात्र उत्पन्न असतानाही कर भरत नसाल तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. देशात लवकरच अर्थसंकल्प 2023 सादर होत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पापूर्वी करपात्र उत्पन्नाविषयी माहिती घेऊयात.
प्राप्तिकर खात्याने करपात्र उत्पन्न श्रेणीची माहिती दिली आहे. सध्या देशात इनकम टॅक्स भरण्यासाठी, जमा करण्यासाठी दोन श्रेणी, स्लॅब उपलब्ध आहेत. यामध्ये New Tax Regime आणि Old Tax Regime यांचा समावेश आहे. त्यानुसार तुम्हाला कर चुकता करावा लागतो.
New Tax Regime मध्ये तुमच्या इतर स्त्रोतानुसार उत्पन्नावर कर द्यावा लागतो. तर Old Tax Regime हा त्यापेक्षा इतर उत्पन्नावरील कर असतो. या जुन्या पद्धतीत करदात्याला काही फायदेही मिळतात. त्यानुसार करदाता त्याच्या स्लॅबची निवड करतो.
करदात्याला New Tax Regime नुसार कर द्यायचा असेल तर त्यासाठी त्याला विविध श्रेणी उपलब्ध असतात. त्याच्या उत्पन्नानुसार त्याला कर चुकता करता येतो. तसेच कर सवलतीसाठी त्याला दावाही दाखल करता येतो. काही जणांना रिटर्नही मिळविता येतो. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
आर्थिक वर्ष FY 20-21 नुसार कर पद्धत आणि तो किती द्यायचा याची माहिती देण्यात आली आहे. New Tax Regime मध्ये वार्षिक 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या श्रेणीतील करदात्यांना उत्पन्नावर 5 टक्के कर द्यावा लागतो.
तर 5 आणि त्यापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी कर पद्धतीनुसार कर अदा करावा लागतो. आर्थिक वर्ष FY 20-21 मध्ये याची माहिती देण्यात आली आहे. New Tax Regime निवडल्यास उत्पन्नावर 10 टक्के कर द्यावा लागतो.
जर वार्षिक 7.5 लाख रुपये उत्पन्न असेल तर अशा करदात्यांना नवीन कर पद्धतीनुसार 10 टक्के कर द्यावा लागतो. 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर करदात्यांना 15 टक्के कर भरावा लागेल.