वाहतूक सिग्नल
Image Credit source: Social Media
मुंबई, मोटार वाहन चालवताना वाहतुकीचे नियम (Traffic Rule) पाळणे आवश्यक आहे. असे न केल्यास, दंड आकारला जाऊ शकतो. बऱ्याचदा अजाणतेपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात त्यातल्यात्यात सिग्नल लाल (Signal Challan) असताना बऱ्याचदा तो तोडला जातो. अशावेळेस सीसीटीव्ही कार्यान्वित प्रणालीद्वारे चालान कापले गेले काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र हे जाणून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. यासाठी थोडा कालावधी जाऊ देणे आवश्यक आहे, मात्र याबद्दलची खात्रीशीर माहिती तुम्हाला कळू शकेल.
चालान कापले गेले आहे की नाही हे कसे कळेल?
- https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा.
- चालान स्थिती तपासा वर क्लिक करा.
- येथे चालान क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय उपलब्ध असेल.
- वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा आणि आवश्यक तपशील भरा.
- चेसिस क्रमांक किंवा इंजिन क्रमांक देखील येथे प्रविष्ट करावा लागेल.
- त्यानंतर ‘गेट डिटेल’ वर क्लिक करा.
- जर चलन कापले गेले तर त्याची माहिती स्क्रीन दाखवली जाईल.
चलन कापले तर ऑनलाइन कसे भरायचे?
- प्रथम वर नमूद केलेल्या संपूर्ण प्रक्रियेचे अनुसरण करा.
- चालान पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- तुमच्या संबंधित कार्डचे तपशील एंटर करा ज्यावरून पेमेंट करायचे आहे.
- कार्डशी संबंधित मोबाईल नंबरवर OTP येईल, तो भरा आणि पेमेंटची पुष्टी करा.
- आता तुमचे चालान भरले जाईल.
अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या वाहनाच्या दंडाबद्दलचा तपशील जाणून घेऊ शकता. याशिवाय त्याची रक्कम देखील कुठेही न जात ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.