सध्या महागाईने(Inflation) लोकांना हैराण केले आहे. त्यामुळे खर्च कोणताही असो महागाईमुळे असा खर्च करण्यापूर्वी दोन वेळा विचार करावा लागत आहे. त्यातही खर्च करणे गरजेचेच असेल तर त्यातून एक-दोन रुपये तरी वाचतील ना यासाठी आटापिटा सुरु होतो. लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून ही म्हण आपल्याकडे व्यवहारात उगीच आलेली नाही. या दोन्ही वेळा मनुष्याची मोठी जमापुंजी खर्च (Saving) होते. त्यामुळे घर बांधताना काही गोष्टी टाळल्या तर फायदा होऊ शकतो. सिमेंट, सळई, वीट, ग्रिल, पेंट, फिटिंग, एवढेच नाही तर घर बांधताना लागणारे पाणी या सर्वांचा खर्च वाचवता आला तर तुम्हाला स्वस्तात तुमचे घराचे (Affordable Housing) स्वप्न पूर्ण करता येईल. अशा महागाईच्या काळात घर बांधताना काय गोष्टींचा वापर करावा हे जर ठरवले तर घर बांधणीचा खर्च अवाक्यात येऊ शकतो.
सहाजिकच घर बांधणे हे काही सोप्पं काम नाही. त्यासाठी मेहनत, पैसा लागतोच. त्यासाठी तुम्ही आयुष्यभर जमा केलेली पै न पै लावण्यात येते. त्यामुळे घर बांधताना बचतीचा विचार केला तर तुमचे लाखो रुपये वाचू शकतात. सर्वात पहिला उपाय म्हणजे बांधकामासाठी जे पण साहित्या लागणार आहे, ते ठोक घ्या. त्यामुळे दुकानदार ही खूष होईल आणि तुम्हाला घसघशीत सवलत देईल. पण हेच सामान तुम्ही वेळोवेळी आणले तर त्याची जास्त किंमत तुम्हाला द्यावी लागेल. त्यावर दुकानदार सूट ही देणार नाही.
विटा विटावर रचून तुमचे घर आकार घेते. सध्या विटांचे भाव जास्त आहे. त्यामुळे लाल विटेऐवजी त्यापेक्षा स्वस्तातला आणि त्याच दर्जाचा टिकाऊ पर्याय तुम्हाला उपलब्ध झाल्यास ? तर हा पर्याय आहे फ्लाई ऐश विटाचा. ही विट सामान्य लाल विटेपेक्षा स्वस्त पडते. फ्लाई ऐश विट ही 2 ते 3 रुपयांनी स्वस्त पडते. जर घर बांधण्यासाठी 50 हजार विटांची गरज असेल तर तुमचे एक ते दीड लाख रुपये सहज वाचू शकतात. विशेष म्हजे फ्लाई ऐश विटेमुळे सिमेंट ही कमी लागते.
घराचे बांधकाम करताना ज्या घटकांमुळे घराचा खर्च जास्त वाढतो. त्यात सॅनेटरी वायर, प्लम्बिंग घटक, इलेक्ट्रिक फिटिंग्स आणि रंगरंगोटीचा खर्च महत्वाचा असतो. यामुळे ही घराचा खर्च वाढतो. या सर्व गोष्टींचा ठेका दिला तर तुम्हाला मजुरी रुपात देण्यात येणारा खर्च कमी लागेल. तसेच ओळखीतून कामे केल्यास तुम्हाला माल ही स्वस्तात मिळेल. थेट डिलरकडून माल घेतल्यास त्यात सवलत मिळेल.
ब्रॅंडेड वस्तुंपेक्षा लोकल सामान स्वस्त मिळते. त्याचा दर्जा तुम्हाल तपासून पहावा लागेल. कधी कधी ब्रँडेड वस्तू आणि लोकल वस्तूमध्ये केवळ लेबलचा फरक असतो. त्यामुळे ब्रँडेडच्या मागे न लागता लोकल व्होकलचा विचार करावा. त्यामुळे ही खर्चात मोठी बचत होऊ शकते.