Marathi News Utility news How will the employee's family get the punishment for the employee's mistake, the account holder has not added the EPF account, even if the heir's name is withdrawn, know the full details
EPFO : काळजी करु नका, कुठे ही पळून जाणार नाही तुमचा पैसा ! वारसदाराचे नाव नसले तरी अशी काढा रक्कम
EPFO : कर्मचाऱ्याची चूक त्याच्या वारसदारांना भोगावी लागत नाही. कागदपत्रांसाठी थोडी फरफट होते, पण खात्यातील रक्कम मिळविता येते...
Follow us on
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ही अनेक बचतींपैकी एक लोकप्रिय योजना आहे. ईपीएफओ ही योजना नियंत्रीत करते. कर्मचारी आणि नियोक्ता, कंपनी हे दोन्ही मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा 12 टक्के रक्कम योगदान देते. ईपीएफओ गुंतवणुकीवर सध्या सर्वाधिक व्याज देते. या योजनेला केंद्र सरकारचे संरक्षण आहे. केंद्र सरकार या योजनेची हमी घेते. कर्मचाऱ्याच्या एकूण योगदानापैकी 8.33 टक्के कर्मचारी निवृत्ती योजनेत (EPS) जमा होते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू ओढवला तर त्याच्या कुटुंबियांना ही रक्कम देण्यात येते. वारसदार अथवा नामनिर्देशित व्यक्तीला ही रक्कम सोपविण्यात येते. जर वारसदाराचे नाव नसेल तर मग ही रक्कम कशी मिळविता येते?
अशी काढता येते रक्कम
एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदार EPF मधील रक्कम काढू शकतो. पण जर नामनिर्दशीत व्यक्ती अथवा वारसदारांची नोंदणी झाली नसल्यास मग काय करता येईल? ही रक्कम बुडीत खात्यात जमा होते का? तर नाही. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या वारसांना मिळते. त्यासाठी काही कागदी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कधी कधी न्यायालयातून त्यासाठीचा हुकूमनामा आणवा लागतो.
सर्वात अगोदर फॉर्म 20 मध्ये ईपीएफ सदस्य आणि रक्कमेवर दावा सांगणाऱ्यांनी तपशीलवार माहिती द्यावी
अर्ज जमा केल्यानंतर दाव्याच्या स्थितीविषयी एसएमएसद्वारे अपडेट अलर्ट देण्यात येतो
हे सुद्धा वाचा
तुमच्या अर्जाची सध्यस्थितीविषयी ईपीएफओच्या वेबसाईटवर गेल्यास माहिती मिळते
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि दावा मंजूर झाल्यावर वारसदाराला मयत कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यातील रक्कम देण्यात येते. ही रक्कम वारसदाराच्या बँक खात्यात थेट जमा होते
हा अर्ज तुम्हाला नियोक्त्या, कंपनीच्या मार्फत करावा लागतो. ज्या ठिकाणी कर्मचारी काम करत होता. त्या कंपनीतून हा अर्ज ईपीएफओम कार्यालयाकडे पाठवावा लागतो
मृत्यूवेळी नियोक्त्याने कर्मचाऱ्याला ईडीएलआय योजनेतंर्गत सवलत दिली नसल्यास त्याची माहिती
दावेदार पति/पत्नी 25 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर आणि मयतावर त्याचे आई-वडिल पण अवलंबून असतील तर त्यांना पेन्शनसाठी फॉर्म 10डी जमा करावा लागेल
रक्कम काढण्यासाठी सर्वात शेवटी फॉर्म 10सी जमा करावा लागेल. ईपीएफ सदस्याचे वय 58 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि त्या तारखेपर्यंत त्याने 10 वर्षांची सेवा बजावली नसेल तर हा फॉर्म भरावा लागतो