Bank Closed : आता आठवड्यातून दोन दिवस बँकांना ताळे! का घेण्यात येत आहे निर्णय

| Updated on: May 04, 2023 | 7:17 PM

Bank Closed : आता देशातील बँका दोन दिवस बंद राहतील. हे काही अनोखे आंदोलन नाही, तर केंद्र सरकारच या विषयीचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, यामागील कारण तरी काय आहे...

Bank Closed : आता आठवड्यातून दोन दिवस बँकांना ताळे! का घेण्यात येत आहे निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : लवकरच सरकारी बँकांना (Bank) आठवड्यातील दोन दिवस भले मोठे ताळे राहिल. दोन दिवस तुम्हाला बँकेकडे फिरकायची गरज राहणार नाही. आठवड्यातील पाचच दिवस बँकांचे (Five Days Working) कामकाज सुरु राहणार आहे. पण या निर्णयाचा तुम्हाला फटका बसणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार खास योजना आखत आहे. ग्राहकांना कुठलाही त्रास न होता, त्यांचे बँकेचे कामकाज न थांबता हा निर्णय घेण्यात येणार आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा निर्णय घेण्यात तरी कशासाठी येत आहे. हा निर्णय घेण्यामागे कारण तरी काय आहे.

कारण तरी काय
सरकारी बँकांचे आठवड्यातून केवळ 5 दिवस कामकाज होईल. याचा सरळ अर्थ, बँकेच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील दोन दिवस सुट्टी असेल. अर्थमंत्रालय लवकरच यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची शक्यता आहे. तसेच याविषयीची अधिसूचनाही काढण्यात येईल. सरकारी बँकेतील कर्मचारी आणि त्यांच्या संघटना यासाठी अनेक दिवसांपासून मागणी करत होते.

वेज बोर्डाकडे प्रस्ताव
CNBC Awaaz ने याविषयीचा एक अहवाल दिला आहे. त्यानुसार, इंडियन बँक्स असोसिएशनने दोन दिवसांच्या सुट्टीचा प्रस्ताव दिला होता. तसेच आठवड्यातून पाचच दिवस कामकाज करण्याची मागणी लावून धरली होती. वेज बोर्डाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून नुतनीकरणासह याविषयीची अधिसूचना काढण्यात येणार आहे. सध्या सरकारी बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी सुट्टी आहे.

हे सुद्धा वाचा

40 मिनिटांचे कामकाज वाढणार
कोविड महामारीच्या सुरुवातीला सरकारी बँकांनी पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी लावून धरली होती. आयबीएने बँक संघटनांच्या या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली होती. आयबीएने या बदल्यात 19 टक्के पगार वाढीचा प्रस्ताव दिला होता. जानेवारी 2023 मध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पण 5 दिवस कामकाज करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी आंदोलन आणि बंद ही पुकारला होता. त्यानंतर आयबीएने या प्रस्तावावर विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी प्रत्येक दिवशी कर्मचाऱ्यांना 40 मिनिटे अधिक काम करावे लाागणार आहे. कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी 9.45 पासून ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत काम करावे लागणार आहे.

मे महिन्यात 11 दिवस बँका बंद
मे महिन्यात 11 दिवस बँका बंद राहतील. मे महिन्यात बुद्ध पौर्णिमा, महाराणा प्रताप जयंती, रवींद्र टागोर जयंती आणि इतर सणांना सुट्टी असेल. यापूर्वी एप्रिल महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद राहतील. प्रत्येक राज्यात बँकांच्या सुट्या वेगवेगळ्या आहेत.

व्यवहार करता येणार
बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील. तर क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.