बॅंक लॉकरमधील पैसा आणि दागिने चोरीला गेले तर जबाबदार कोण ? आरबीआयचे नवे नियम काय ?

| Updated on: Sep 02, 2023 | 2:57 PM

बॅंकेच्या लॉकरमधील पैसाअडका जर बॅंकेवर पडलेल्या दरोड्यात लुटला गेला तर बॅंकेची नेमकी जबाबदारी काय ? आरबीआयचे नवे नियम काय आहेत ?

बॅंक लॉकरमधील पैसा आणि दागिने चोरीला गेले तर जबाबदार कोण ? आरबीआयचे नवे नियम काय ?
bank locker
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : घरात चोरी आणि दरोड्याच्या भीतीने लोक बॅंकांच्या लॉकरमध्ये पैसा अडका दागिने ठेवणे सुरक्षित मानत असतात. घराच्या तुलनेत बॅंकचे लॉकर सुरक्षित मानले जात असतात. त्यामुळे जास्त रक्कम असेल, दागिने वा महत्वाची कागद पत्रे ग्राहक बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य देत असतात. बॅंकेचे लॉकर ग्राहकांना सुरक्षित वाटत असते. परंतू एखादी दुर्घटना किंवा अप्रिय घटना घडल्यास बॅंकेतील लॉकरमधील रोकड किंवा दागिन्यांचे नुकसान झाले तर त्याची भरपाई कोण करणार ? रिझर्व्ह बॅंकेचे नेमके काय नियम आहेत ?

हॉटेल, भाड्याचे घर किंवा इतर ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी ही ग्राहकांवरच टाकली जाते. हॉटेलात लिहिलेले असते की स्वत:च्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी ग्राहकांवरच आहे. बॅंकातील लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाला नुकसान झाल्यावर त्याची जबाबदारी नेमकी कोणावर असते. यात बॅंकांची जबाबदारी काहीच नाही का ? बॅंक लॉकरसंबंधीत अनेक प्रकरणानंतर आता आरबीआयने बॅंक लॉकरबाबत जबाबदारी निश्चित केली आहे.

तर ग्राहकांना मिळणार भरपाई

आरबीआयने नवीन नियमात स्पष्टपणे सांगितले की बॅंक लॉकरमध्ये ठेवलेल्या ग्राहकांच्या मौल्यवान ऐवजाला खालील कारणांनी  नुकसान पोहचले तर बॅंक ग्राहकाला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या शंभर पट भरपाई देण्यास बांधील रहाणार आहे. बॅंक लॉकरला आगीमुळे किंवा बॅंकेवर पडलेल्या दरोड्याने नुकसान झाले तरी बॅंकेला त्याची भरपाई द्यावी लागणार आहे. कारण अशा घटनांना बॅंकेचा हलगर्जीपणा मानला जाईल. अशा घटनात बॅंक कोणत्याही परिस्थितीत हे सांगू शकत नाही त्यांची काहीही जबाबदारी नाही.

अशा प्रकरणात भरपाई नाही

बॅंक लॉकरमध्ये ग्राहकांनी ठेवलेल्या मौल्यवान ऐवजाची जबाबदारी सर्वच प्रकरणात केवळ बॅंकेचीच असते असे नाही. जर बॅंकेतील लॉकरला नैसर्गिक आपत्ती पूर, भूकंपासारख्या घटनांमध्ये काही नुकसान पोहचले तर मात्र बॅंकेची जबाबदारी राहणार नाही. तसेच ग्राहकांच्या हलगर्जीपणामुळे जर लॉकरमधील रोख रकमेला काही नुकसान झाले तरीही बॅंकेची काही जबाबदारी राहणार नाही.