नवी दिल्ली : देशातील प्रत्येक नागरिकाला कधी ना कधी बँकेत (Bank) जावेच लागते. नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक अथवा इतर कोणताही नागरीक असो, त्याचे बँकेत काम पडतेच. अनेकदा ग्राहकाला (Consumer) नाहक रांगेत तास न तास उभे रहावे लागते. पण त्याचे काम काही होत नाही. कर्मचारी मुद्दामहून त्यांचे काम लवकर करत नसल्याचा अनुभव नागरिकांना, ग्राहकांना येतो. किरकोळ कामासाठी ही बँकेतील कर्मचारी दोन-तीन फेऱ्या मारायला लावतात. कर्मचाऱ्यांच्या या लालफितशाहीविरोधात तुम्हाला आवाज उठवता येतो. अगोदर संबंधीत शाखेच्या व्यवस्थापकाकडे (Manager) तक्रार करता येते. त्याने तक्रारीची दखल घेत नाही तर मग तुम्हाला सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागता येते.
अनेकदा आपण बँकेच्या शाखेत जातो. पण त्याठिकाणी कर्मचारीच दिसत नाही. असला तरी तो त्याच्या जागेवर दिसून येत नाही. कामाविषयी विचारणा केली तर अधिकारी आणि कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. टाळाटाळा करतात, असे दिसून येत असेल तर तुम्हाला यासंबंधीची तक्रार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) , लोकपाल (Lokpal) वा ग्राहक आयोगाकडे (Consumer Forum) करता येते.
देशातील अनेक बँकांमध्ये ग्राहकांना कर्मचाऱ्यांचे विचित्र अनुभव येतात. त्यांना वेळेवर त्यांचे काम करुन मिळत नाही. कर्मचारी जागेवर नसतो. ज्या कामासाठी गेले, ते काम करण्यासाठी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगण्यात येते. दुसऱ्या दिवशी गेल्यावर संबंधित कर्मचारी सुट्टीवर असतो. असे प्रकार अनेकदा होतात. कधी कधी कर्मचारी ग्राहकाला दिवसभर ताटकाळत ठेवतात. अशावेळी बँकेच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते. अथवा बँका तक्रारीसाठी काही तक्रार क्रमांकही देतात. बँकेच्या तक्रार निवारण क्रमांकाआधारे तक्रार दाखल करता येते.
आपल्या रोजच्या व्यवहाराचा सर्व तपशील बँकेच्या स्टेटमेंटमधून (Bank Statement Check) बाहेर पडतो. बँक खात्यातून होणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवहारासाठी बँक स्टेटमेंट महत्वाचा दस्तावेज आहे. पण आपण बऱ्याचदा ई-मेलवर येणाऱ्या बँक स्टेटमेंटकडे दुर्लक्ष करतो. बँक स्टेटमेंट तपासण्याचे अनेक फायदे आहेत. दर महिन्याला बँक स्टेटमेंट जनरेट होते आणि तुम्हाला ई-मेलवर पाठविण्यात येते. पण अनेकदा आपण हा ई-मेल चेक न करताच डिलिट करतो. ही एक प्रकारे आपली आर्थिक कुंडली असते. त्यामुळे बँकेचे स्टेटमेंट नक्की चेक करा.
येथे करा तक्रार