नवी दिल्ली : अनेकदा धावपळीत अथवा थोडी गडबड झाली की रेल्वे निसटते (Miss the Train). मु्द्दाम कोणीच ट्रेन मिस करत नाही. तिकीट (Railway Ticket) असताना रेल्वे हातची निसटली तर मग जास्त फजिती होते. अशावेळी एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो की, ही ट्रेन तर सूटली आता दुसऱ्या रेल्वेत अगोदरच्याच तिकीटावर प्रवास करता येतो का? दुसऱ्या ट्रेनसाठी पुन्हा तिकीट खरेदी करावे लागते? याविषयीचा नियम काय सांगतो, पुन्हा खिशाला भूर्दंड बसतो की पहिल्याच तिकीटावर दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करता येतो.
जर तुमची रेल्वे सूटली, तर तिच्या तिकीटावर दुसऱ्या, पुढच्या रेल्वेचा प्रवास करता येतो का? तर यांचे उत्तर तुमच्या तिकीटाच्या श्रेणीवर अवलंबून आहे. रेल्वेच्या नियमानुसार, जर तुम्ही तिकीट आरक्षित केले असेल आणि रेल्वे सूटली तर तुम्हाला दुसऱ्या रेल्वे तिकीटावर सफर करता येत नाही.
रेल्वेच्या नियमानुसार, तुमची जागा आरक्षित ठेवण्यात येते. त्यामुळे त्याच ट्रेनमधून तुम्हाला प्रवेश करता येतो. पण ही रेल्वे हातची सूटली तर दुसऱ्या रेल्वेने तुम्हाला प्रवेश करता येत नाही. पण इतर तिकीटावर असा प्रवास करता येत नाही.
पण तुमच्याकडे रेल्वेचे जनरल तिकीट असेल तर त्याच तिकीटावर दुसऱ्या रेल्वेनेही तुम्हाला सफर करता येतो. कारण तुमच्याकडे सर्वसाधारण श्रेणीचे तिकीट असते आणि हे तिकीट सर्वच रेल्वेत ग्राह्य असते. रिझर्व्ह तिकीटासाठी मात्र हा नियम लागू नाही. रेल्वे सूटल्यावर तुम्हाला नवीन तिकीट खरेदी करावे लागते.
erail.in नुसार, तुम्ही ज्या रेल्वेने प्रवास करण्यासाठी जागा आरक्षित केली असेल आणि ती हातची सूटली तर तुम्हाला तिकीटाची रक्कम परत मागता येते. रिफंड मागण्यासाठी तुम्हाला रेल्वेकडे दावा करावा लागतो. रेल्वेच्या तिकीटाच्या नियमानुसार तुम्हाला रक्कम परत करण्यात येते.
जर तुम्हाला रिफंड हवा आहे, तर त्यासाठी तिकीट रद्द (Ticket Cancelled) करण्याची गरज नाही. त्यासाठी टीडीआर फाईल करावे लागते. निर्धारीत वेळेत तुम्ही निश्चित रेल्वे प्रवास का करु शकला नाही, याचं कारण तुम्हाला सांगावे लागते. ट्रेन का मिस झाली याची माहिती तुम्हाला द्यावी लागते.
ट्रेनचा चार्ट तयार करण्यापूर्वीच तुम्ही तिकीट रद्द केले तर रक्कम परत मिळविण्यासाठी दावा करता येतो. पण ट्रेनचा चार्ट तयार झाल्यावर तिकीट रद्द केल्यास तुम्हाला रक्कम रिफंड (Refund) मिळत नाही. तसेच टीडीआर ही तात्काळ फाईल केला तरच फायदा होतो. एक तासानंतर तुम्ही असा प्रयत्न केल्यास रिफंड मिळण्यात अडचण येते.