नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Government) अनेक बचत योजना राबविते. या अल्पबचत योजनांमध्ये भारतीय नागरिक या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. या योजनांना केंद्र सरकारचे संरक्षण मिळते. या योजनांमधून अनेक गुंतवणूकदार कमाई करतात. सुरक्षित आणि जोरदार परतावा मिळतो म्हणून अनेक जण या योजनांकडे वळतात. या योजनांपैकीच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund-PPF) ही एक योजना आहे. पण जमेची बाजू असतानाच या योजनेतील गुंतवणूक नुकसानदायक ही ठरु शकते. ज्यांना अधिक फायदा कमावायचा आहे. त्यांना दीर्घकालवधीतच इतर पर्यायातून अधिकचा परतावा मिळवता येतो.
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीत (PPF Scheme) मोठी रक्कम बचत करता येते. या योजनेत गुंतवणूकदाराला कर सवलतीचा फायदा मिळतो. ही सरकारी योजना असल्याने यातील रक्कम डुबण्याची वा फसविण्याची कुठलीही भीती नसते. पीपीएफ योजनेवर सध्या केंद्र सरकार 7.1 टक्के वार्षिक व्याज देते. या योजनेत दीर्घकालीन अवधीसाठी गुंतवणूक करता येते. दीर्घकालीन गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. त्यांना कर सवलत मिळत असल्याने एकाच गुंतवणुकीवर डबल फायदा होतो.
पीपीएफ योजनेत गुंतवणूकदार 15 वर्षांकरीता गुंतवणूक करु शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्याची एक मर्यादा आहे. ही मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पीपीएफ योजनेत गुंतवणूकदाराला एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. पीपीएफ स्कीममध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षात सध्या 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. सध्या या गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज मिळेल. तसेच गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.
पीपीएफ योजनेत गुंतवणूक करताना सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे या योजनेचा कालावधी, मॅच्युरिटीसाठी गुंतवणूकदाराला मोठी वाट पहावी लागते. पीपीएफ योजनेत मॅच्युरिटी 15 वर्षांची आहे. म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर रक्कम 15 वर्षांसाठी अडकते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर योजनेतंर्गत मिळणारा सर्व फायदा मिळतो. गरज असेल तर रक्कम काढता येते. PPF विथड्रॉल रेग्युलेशन अॅक्ट 2021 अंतर्गत, खात्यातील शिल्लक रकमेवर कर्ज घेता येते. मुळ PPF काढण्याच्या अटींनुसार,तिसऱ्या आर्थिक वर्षात व्याज घेता येते. त्यासाठी तुम्हाला 2% व्याज द्यावे लागते.
पीपीएफ योजनेत केंद्र सरकार व्याजदर निश्चित करते. दर तीन महिन्यांनी व्याज दराचा आढावा घेण्यात येतो. व्याजदर सातत्याने बदलतात अथवा त्यात बदल होत नाही. सध्या या योजनेत गुंतवणूकदारांच्या रक्कमेवर 7.1 टक्के व्याज मिळते. व्याज कंपाऊंडिंग पद्धतीने देण्यात येते. पण जर तुम्हाला अधिक परतावा हवा असेल तर ही योजना तुमच्यासाठी कुचकामी ठरते.