Income Tax : परतावा हवा झटपट, तर दाखल करा इनकम टॅक्स रिटर्न

| Updated on: Jul 23, 2023 | 2:55 PM

Income Tax : इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची घाई करा, तेव्हा तुम्हाला लवकर रिफंडसाठी दावा करता येईल. आयटीआर दाखल करताना चुका करु नका. नाहीतर रिफंड दूरच राहील. दुरुस्ती करतानाच नाकी नऊ येतात.

Income Tax : परतावा हवा झटपट, तर दाखल करा इनकम टॅक्स रिटर्न
Follow us on

नवी दिल्ली | 23 जुलै 2023 : आता इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची घाई करा. अंतिम मुदत जवळ आली आहे. 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला विलंब शुल्कासह दंड बसू शकतो. आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयटीआर भरता येईल. प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी आता एक आठवडा उरला आहे. पण आयटीआर भरताना गडबड करु नका. नाहीतर दुरुस्तीसाठी नाहक वेळ जाईल. आयटीआर जलद भरण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे. लवकर प्राप्तिकर रिटर्न भरला तर लवकर कर परतावा मिळेल.  पॅन क्रमांक, मुल्यांकन वर्ष आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे तुम्हाला  रिफंडचे (Refund) स्टेट्स पण चेक करु शकता.

ही चूक करु नका

ITR फायलिंग वेळी करदाते अनेकवेळा छोट्या-मोठ्या चुका करतात. त्यामुळे अनेकदा रिफंड मिळण्यास उशीर होतो. पहिल्यांदा इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणार असाल तर तुम्ही या चुका करु नका. ई-फायलिंग पोर्टलवर ITR भरताना चुका टाळणे आवश्यक आहे. योग्य माहिती आणि तपशील देणे आवश्यक आहे. मुल्यांकन वर्षांत तुम्हाला या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळते. त्याकाळात चुका दुरुस्त करता येतात. पण परतावा लवकर मिळत नाही.

हे सुद्धा वाचा

तर नोटीस

बँक खात्याचा तपशील, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसह इतर योग्य तपशील जमा करणे आवश्यक आहे. योग्य तपशील न जमा केल्यास रिफंड मिळणार नाही. त्यात अडचण येते. तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस पण मिळू शकते. आयकर विभाग तुमचा तपशील पडताळतो. त्यानंतर रिफंड मिळतो.

असा चेक करा रिफंड

तुम्ही प्राप्तिकर रिटर्न फाईल केल्यानंतर रिफंड स्टेटस चेक करु शकता. आयटीआर फाईलिंगसाठी तुम्हाला ई-फाइलिंग पोर्टलला भेट द्यावी लागेल. तसेच या ठिकाणी तुम्हाला रिफंड स्टेटसवर क्लिक करता येईल. त्याठिकाणी तुम्हाला पॅन क्रमांक, मुल्यांकन वर्ष आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. तुमच्या मोबाईलवर OTP येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला काही मिनिटातच इनकम टॅक्स रिफंडचे स्टेट्स पाहाता येते.

दंडाचा फटका

आयटीआर अंतिम मुदतीपूर्वी अथवा अंतिम तारखेला भरणे आवश्यक आहे. नाही तर करदात्याला भूर्दंड बसतो. करदात्यांना अनेक प्रकारच्या लाभापासून वंचित रहावे लागते. अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागतो. काही प्रकरणात तुरुंगाची हवा पण खावी लागू शकते. आयटीआर फाईल करण्यासंबंधी प्राप्तिकर खात्याचे नियम आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा फटका बसतो.