नवी दिल्ली : आयआयटी गुवाहाटीमध्ये (IIT Guwahati) सध्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटचा हंगाम (Placement Seasons) सुरु आहे. हुशार विद्यार्थ्यांना नोकऱ्या (Jobs) देण्यासाठी मोठ-मोठ्या कंपन्या, ब्रँड्स (Big Companies, Brand) कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत. या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला पगाराचा आकडा (Salary Amount) ऐकून भल्याभल्यांना आकडी आल्याशिवाय राहणार नाही.
IIT गुवाहाटीतील एका विद्यार्थ्याला तब्बल 1.20 कोटी रुपयांचं पॅकेज मिळाले आहे. हे आतापर्यंतच सर्वात महागडे वार्षिक पॅकेज ठरले आहे. या संस्थेच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्री-प्लेसमेंट ऑफरमध्ये 21 टक्के वाढ झाली आहे.
या वर्षांत, 2021-22 या शैक्षणिक वर्षात 179 नोकरी प्रस्तावांसह 218 प्री-प्लेसमेंट ऑफर लेटर यापूर्वीच प्राप्त झाले. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना मोठी लॉटरी लागली आहे. 1 डिसेंबरपासून कॅम्पस प्लेसमेंटचा पहिला टप्पा सुरु होत आहे. तोपर्यंत प्री-प्लेसमेंट सुरु राहण्याची अपेक्षा आहे.
इंटर्नशीप प्रोग्रॅम आणि सेंटर फॉकर करिअर डेव्हलपमेंट या दोन कार्यक्रमांमुळे अनेक कंपन्या कॅम्पसमध्ये दाखल होत असून विद्यार्थ्यांना ऑन स्पॉट जॉब मिळत आहे. त्यामुळेच प्री-प्लेसमेंटमध्ये आगाऊ नोकऱ्यांचे खाते उघडल्याचा दावा आयआयटी गुवाहाटीने केला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. अभिषेक कुमार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच नोकऱ्या देण्यासाठी आणि प्री-प्लेसमेंटसाठी संस्थेने तांत्रिक क्लबशी करार केला आहे.
2019-20 या काळात सर्वात जास्त 49 लाखांचं वार्षिक पॅकेज मिळालं होतं. त्यानंतर हा आकडा वाढत गेला. 2020-21 मध्ये 64 लाख, 2021-22 मध्ये सर्वाधिक 56 लाख तर यंदा आतापर्यंतच सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 1.20 कोटी रुपयांचं पॅकेज मिळाले आहे.
पीपीओ एसेंचर, एडोब, अॅमेझॉन, एक्स्ट्रिया, एक्जेला, बजाज ऑटो, फ्लिपकार्ट, जीई हेल्थ केअर, जेपी मॉर्गन यासह अनेक जागतिक दिग्गज कंपन्या या कॅम्पसमध्ये आगाऊ नोकऱ्या देण्यासाठी इच्छूक असल्याचे समोर आले आहे.