नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) बनावट खाते ओळखण्यासाठी आणि बोगसगिरीला चाप लावण्यासाठी खास मोहिम सुरु केली आहे. त्यात अनेकदा ग्राहकांना त्यांचे केवायसी कागदपत्रे (KYC Document) जमा करण्यास सांगण्यात येते. बँका वेळोवेळी ग्राहकांना याविषयीची माहिती देतात. ई-मेल, एसएमएस याद्वारे ही माहिती देण्यात येते. बँका ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने केवायसी अपडेट करतात. पण त्यासाठी बँका कोणतीही लिंक पाठवत नाहीत. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते अथवा जवळच्या शाखेत जाऊन कागदपत्रे जमा केल्यास केवायसी अपडेट होते. पण ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांचे खाते बंद होते. अशावेळी हे खाते कायमचे बंद (Account Block) झाले आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण असे नसते. तुम्हाला या पद्धतीने ही खाते पुन्हा सक्रिय करता येते.
प्रत्येक ग्राहकाला केवायसी महत्वाचे
प्रत्येक ग्राहकाला केवायसी महत्वाचे असते. केवायसी प्रक्रिया प्रत्येक कॅटेगिरीतील ग्राहकांसाठी वेगवेगळी असते. अतिजोखीम असणाऱ्या ग्राहकांसाठी दोन वर्ष, मध्यम जोखीम घेणाऱ्या ग्राहकांसाठी 8 वर्षे तर कमी जोखीम असणाऱ्या ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा केवायसी करणे आवश्यक आहे. ज्यांचा जास्त व्यवहार त्यांच्यासाठी दोन वर्षात एकदा केवायसी अपडेट करणे आवश्यक असते. कारण हँकर्स त्यांच्या खात्यावर लक्ष ठेऊन असतात.
आरबीआयचे म्हणणे काय
भारतीय रिझर्व्ह बँकेने 4 मे 2023 रोजी यापूर्वीचे 29 मे 2019 रोजीचे परिपत्रक अपडेट केले आहे. जर कोणताही ग्राहक त्यांचे पॅन अथवा फॉर्म 16 देणार नाही, त्यांचे खाते बंद करण्यात येईल. अर्थात बँक थेट तुमचे खाते बंद करत नाहीत. त्यासाठी अगोदर तुम्हाला एसएमएस अथवा ई-मेल पाठविण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
कसे करता येईल खाते सक्रिय