नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : या आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल (ITR Filing) करण्याची अंतिम मुदत आता तोंडावर आली आहे. प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. म्हणजे साधारणतः तुमच्या हातात 10 दिवस उरले आहेत. अनेक करदात्यांनी (Taxpayers) आयटीआर फाईल करुन त्यांचे कर्तव्य बजावले आहे. तर काहींना अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. त्यांना कामातून सवड मिळत नाही. त्यांना आळस सोडवत नाही. तसेच काहींना अंतिम मुदतीनंतर प्राप्तिकर रिटर्न भरला तर काय मोठा फरक पडतो? विलंब शुल्क भरले की झाले, असा काहींचा समज आहे. पण अंतिम मुदतीनंतर, डेडलाईननंतर आयटीआर भरला तर केवळ दंडच भरावा लागत नाही तर अनेक बाबतीत नुकसान होते.
मुदत वाढणार नाही
गेल्यावर्षीपेक्षा यंदा आयटीआर दाखल करण्याचे प्रमाण अधिक असू शकते. तसेच आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुटसूटीत आणि सोपी करण्यात आली आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तात्काळ करदात्यांनी आयटीआर भरण्याचे आवाहन त्यांनी केले. आयटीआर भरण्यासाठी अर्थ मंत्रालय कोणती पण मुदतवाढ देणार नसल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.
नियम म्हणणे काय?
आयटीआर अंतिम मुदतीपूर्वी अथवा अंतिम तारखेला भरणे आवश्यक आहे. नाही तर करदात्याला भूर्दंड बसतो.
करदात्यांना अनेक प्रकारच्या लाभापासून वंचित रहावे लागते. अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागतो. काही प्रकरणात तुरुंगाची हवा पण खावी लागू शकते. आयटीआर फाईल करण्यासंबंधी प्राप्तिकर खात्याचे नियम आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा फटका बसतो.
डेडलाईन नंतर ITR फाईलिंगचे नुकसान