देशाच्या प्रमुख खासगी बँकांमध्ये समावेश होणाऱ्या यस बँकेने (Yes Bank) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एस बँकेकडून जवळपास सर्वच प्रकारच्या लोनवरील एमसीएलआरमध्ये 10 ते 15 बेसीस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्ज (Loan) आणखी महाग होणार आहे. बँकेचे एमसीएलआरबाबतचे (mclr) नवे नियम दोन मे पासून लागू होणार असल्याची माहिती बँक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कर्ज महाग झाल्याने ग्राहकांना कर्जानंतर भराव्या लागणाऱ्या ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे. बँकेच्या वेबसाईटवरून मिळत असलेल्या माहितीनुसार एक महिन्याचा एमसीएलआर वाढून 7.30 टक्के करण्यात आला आहे. तीन महिन्याचा एमसीएलआर 7.45 सहा महिन्याचा एमसीएलआर 8.25 तर एका वर्षांचा एमसीएलआर वाढीसह 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे.
केवळ एस बँकेनेच नाही तर गेल्या महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्र या बँकांनी सुद्धा आपल्या एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या वतीने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट स्थिर आहे. सध्या रेपो रेट चार टक्के एवढा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसताना देखील संबंधित बँकांकडून एमसीएलआरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा फटका हा ग्राहकांना बसणार असून, लोन अधिक महाग होणार आहे. तसेच ईएमआयमध्ये देखीव वाढ होऊ शकते.
एमसीएलआर वाढवण्याचा थेट संबंध कर्ज महाग होण्याशी आहे. एमसीएलआर वाढवला याचा अर्थ बँकेने आपल्या कर्जाच्या दरात वाढ केली. कर्ज महाग झाल्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे. आधीच देशात महागाई गगनाला भिडली आहे. आता त्यात कर्ज महाग झाल्याने याचा दुहेरी फटका हा ग्राहगांना बसू शकतो. ग्राहकांचा ईएमआय वाढण्याची शक्यता आहे.