भारतात पुढील काही महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी (Employees) आपल्या नोकरीचा राजीनामा देऊ शकतात. कोरोना काळानंतर कर्मचाऱ्यांचे राजीनामा देण्याचे प्रमाण वाढल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. रिक्रूमेंट एजन्सी मायकल पेजने याबाबतचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार पुढील सहा महिन्यांत कर्मचाऱ्यांचे राजीनामा देण्याचे प्रमाण 86 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. चांगला पगार (Salary) आणि वर्क लाईफचे (Work Life Balance) योग्य संतुलन या दोन प्रमुख कारणांमुळे राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढू शकते असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार 61 टक्के असे कर्मचारी आहेत जे चांगल्या वर्क लाईफसाठी राजीनामा देऊ इच्छितात. कोरोना काळानंतर राजीनामा देणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात हे प्रमाण आणखी वाढू शकते असे या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात पुढे असे म्हटले आहे की, पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी आपल्या सध्या सुरू असलेल्या नोकरीचा राजीनामा देऊ शकतात. कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे संबंधित संस्थांचे काम प्रभावित होऊ शकते. कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम देण्यात आले होते. मात्र यातील असे देखील काही कर्मचारी होते, ज्यांना वर्क फॉर्म होम न आवडल्याने त्यांनी राजीनामे दिले. या कर्मचाऱ्यांनी संख्या आकरा टक्के एवढी आहे. तसेच कार्यालयात येताना कोरोना नियमांचे पालन करणाऱ्यावरून देखील अनेकदा कर्मचारी आणि व्यवस्थापनात वाद झाल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.
अनेक कर्मचारी आपल्या करीअरबाबत चिंतेत असतात. जर दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये चांगील संधी मिळाली. आहे त्यापेक्षा अधिक पगार मिळाला तर असे कर्मचारी आपल्या जुन्या नोकरीचा राजीनामा देतात आणि नवी नोकरी जॉईन करतात. रिक्रूमेंट एजन्सी मायकल पेजने कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण याबाबत एकूण बारा देशातील कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये असे आढळून आले की, भारतातील कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेसिया, थायलंड या देशातील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.