नवी दिल्ली : जेव्हा आपण कोणत्याही बँकेचे खाते (Bank Account) उघडतो, तेव्हा बँक आपल्याला एटीएम कार्ड (ATM Card) देते. या माध्यमातून आपण ऑनलाईन पेमेंटपासून ते एटीएम मशीनमधून रोख रक्कम काढण्यापर्यंत अनेक काम करु शकतो. पण एटीएमचा एवढाच मर्यादीत वापर असतो, असा जर तुमचा समज असेल तर हा समज दूर करा. कारण एटीएम कार्ड घेतल्यापासून तुम्हाला विमा संरक्षणही मिळते. फार कमी लोकांना माहिती आहे की, त्यांना त्यांच्या विमा कार्डवर विम्याचे संरक्षण (Insurance Cover) मिळते. तुमच्या एटीएम कार्डवर विम्याचा लाभ मिळतो. पैसे काढण्यासोबतच तुम्हाला एटीएम कार्डचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. तुमच्या एटीएम कार्डवर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंताचा विमा मिळतो. खाते उघडल्यानंतर तुम्हाला बँक एक कीट देते. त्यात धनादेशासह इतर कागदांचा गठ्ठा असतो आणि एक एटीएमही असते. एटीएम कार्डवर तुम्हाला 25 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. याविषयी मात्र जनतेला माहिती नसते. त्यामुळे या एटीएम कार्डचा ते फायदा घेऊ शकत नाही.
खातेदाराला एटीएम कार्डवर 25 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे संरक्षण मिळते. पण त्यासाठी एक अट आहे. त्यानुसार, जे खातेधारक त्यांच्या एटीएम कार्डचा 45 दिवसांपेक्षा जास्त वापर करतात. त्यांनाच विम्याचे संरक्षण मिळते. सरकारी आणि खासगी बँकांच्या एटीएमवर विम्याची सुविधा मिळते.
अर्थात तुमच्या एटीएमवर विम्याचे संरक्षण मिळत असेल तरी ही रक्कम किती मिळेल हे तुमच्या एटीएम कार्डच्या कॅटेगिरीवर, श्रेणीवर अवलंबून असते. एटीएम कार्डचे अनेक प्रकार असतात, त्यानुसार त्यावर विविध फायदे मिळतात. प्रत्येक कॅटेगिरीनुसार विम्याची वेगवेगळी रक्कम ठरलेली असते. त्यानुसार तुम्हाला विम्याचे संरक्षण मिळते.
विम्याची रक्कम वेगवेगळ्या प्रकारची असते. तुमच्या कॅटेगिरीवर ही रक्कम अवलंबून असते. जर तुमचे कार्ड क्लासिक कॅटेगिरीचे असेल तर एक लाखांचे विमा संरक्षण मिळते. प्लॅटेनियम कार्डवर दोन लाख रुपये, प्लॅटेनियम मास्टर कार्डवर पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
तर व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा करता येतो. मास्टर कार्डवर 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळते. प्रधानमंत्री जनधन खात्यावर मिळणाऱ्या रुपे कार्डवर ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपायांचे विमा संरक्षण मिळते.
जर खातेदाराचा अपघाती मृत्यू ओढावला, तर या विमाआधारे त्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. या इन्शुरन्सचा दावा करण्यासाठी कार्ड होल्डरच्या वारसांना बँकेत जाऊन एक अर्ज भरुन द्यावा लागतो. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यावर विम्याची रक्कम कार्डधारकांच्या वारसांना मिळते.