होम लोनचं (Home loan) ओझं कमी करणारी कोणतीही ऑफर संदीपच्या नजरेतून सुटत नाही. स्टॅडंर्ड चार्टेड बँकेची फक्त व्याज भरा ऑफर संदीपच्या नजरेत पडली, त्यानंतर तो कॅल्कुलेशन करू लागला. जर मूळ कर्जाची (debt) रक्कम भरण्यासाठी दोन ते तीन वर्षांची सूट मिळत असेल तर त्यामुळे EMI चं ओझं कमी होईल ? मात्र, बँकांकडून (bank) आपल्या ग्राहकांना खरोखरच एवढी सूट दिली जाते का? संदीपसारखे अनेक जण यासारख्या ऑफरमधून तात्कालिक फायद्याच्या मागे लागतात. मात्र, यासारख्या ऑफरमध्ये दीर्घकालीन परिणामाकडेही लक्ष द्यावे लागते. फक्त स्टॅडर्ड चॉर्टर्डच नाही तर सर्वच बँका अशाप्रकारच्या ऑफर वेगवेगळ्या नावाने देत असतात. प्रत्येक ऑफरमध्ये फीचर्स वेगवेगळे असू शकतील. कर्ज परतफेडीमध्ये फ्लेक्सिबिलिटीही मिळते या सर्व ऑफरमध्ये समान आहे. SBI कडून मॅक्स गेन नावाची अशीच ऑफर आहे. HDFC कडून देण्यात येणारी स्टेअप अप रीपेमेंट फॅसिलिटी आणि टेलिस्कोपिक रीपेमेंट प्लॅनसुद्धा असाच आहे.
प्रत्येक बँक ग्राहकाला FOIR च्या आधारावर कर्जाची रक्कम निश्चित करते. FOIR म्हणजे Fixed obligation To Income Ratio तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत आर्थिक जबाबदारी किती आहे ? हे यातून दिसून येते. याच आधारावर तुम्हाला किती रुपयांचे कर्ज मिळणार हे निश्चित होते. संदीपच्या सध्याच्या पगारानुसार 20 वर्षांसाठी 60 लाख रुपयांचं होमलोन मिळू शकतं. 6.75 टक्के व्याज दरानं 45,621 रुपयांचा हप्ता बसतो, मात्र, संदीपला यापेक्षा मोठ्या रक्कमेचं होमलोन हवं आहे. परंतु त्याचं तेवढं उत्पन्न नाही, अशात होमलोनची रक्कम 81 लाख रुपये केल्यास हप्ता 61,000 रुपयांचा होईल. मात्र, या कर्जासाठी फक्त कर्जावरील व्याजाचा पर्याय निवडल्यास 45,562 रुपयांचा हप्ता भरावा लागणार. म्हणजेच 60 लाख रुपयांच्या कर्जाची पात्रता असताना 81 लाख रुपयांचे कर्ज घ्यायचं. मात्र, हप्ता भरणार फक्त 60 लाख रुपयांएवढाच, याचे अनेक तोटे देखील आहेत. या योजनांचा फायदा घेताना नेमकी काय काळजी घ्यावी ते आता आपण पाहूयात.
भविष्यात आपलं उत्पन्न वाढणार असेल किंवा जास्त ईएमआय भरू शकणाऱ्या व्यक्तीनं आपल्या पात्रतेपेक्षा अधिक कर्ज घेणं योग्य आहे. सुरुवातीला ईएमआय कमी वाटू शकतो. मात्र, कर्जाची मूळ रक्कम कायम राहते. जेंव्हा मूळ कर्जाची परतफेड होण्यास सुरुवात होईल त्यावेळीही व्याज द्यावं लागले. त्यामुळे ईएमआय वाढतो. एवढंच नाही तर कर्जाचा कालावधीही वाढतो, अशी माहिती आर्थिक सल्लागार हर्ष रुंगठा यांनी दिलीय. यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात तुम्ही 7 टक्के व्याजदरानं 15 वर्षांसाठी 40 लाख रुपयांचं होम लोन घेऊ शकता. तर दुसऱ्या पर्यायामध्ये 7 टक्के व्याज दरानं 18 वर्षाच्या कालावधीसाठी कर्ज घ्या. यात फक्त केवळ तीन वर्षासाठी व्याज भरा. दुसऱ्या पर्यायात पहिल्या पर्यायापेक्षा तुम्हाला 8 लाख 40 हजारांचे जास्तीचे व्याज द्यावे लागणार आहे. म्हणजेच काय जर तुम्ही बँकेच्या अशा एखाद्या योजनेचा फायदा घेण्याचा विचार करत असाल तर त्याचा तुम्हालाच मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
IDBI बँकेच्या ‘या’ योजनेत मिळवा दुहेरी फायदा, चांगल्या परताव्यासोबतच टॅक्सची बचत
Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; व्यवहारांमुळे विश्वास गमावला