एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा 150 रुपये, नोकरी मिळण्यापूर्वी मुलं होतील लक्षाधीश

| Updated on: Jul 03, 2021 | 6:59 PM

पॉलिसीमध्ये गुंतवणूकीसाठी मुलाच्या पालकांचे आधार कार्ड, जर मुलाकडेदेखील आधार असेल तर त्याची प्रत, पालकांचे पॅनकार्ड आणि निवासाचा पुरावा आवश्यक असेल पॉलिसी धारकाची वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. (Invest Rs 150 per day in this LIC policy, children will become millionaires before they get a job)

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा 150 रुपये, नोकरी मिळण्यापूर्वी मुलं होतील लक्षाधीश
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा 150 रुपये, नोकरी मिळण्यापूर्वी मुलं होतील लक्षाधीश
Follow us on

नवी दिल्ली : प्रत्येक पालक मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी धडपडत असतात. म्हणूनच त्यांचे शिक्षण आणि इतर गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी सुरुवातीपासूनच बचत करणे सुरू करतात. जर आपण आपल्या मुलाला नोकरी मिळण्यापूर्वीच आत्मनिर्भर बनवू इच्छित असाल तर एलआयसीची न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन पॉलिसी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये मॅच्युरिटीला चांगला परतावा मिळतो, ज्यामुळे मूल मोठे झाल्यावर लक्षाधीश होऊ शकते. (Invest Rs 150 per day in this LIC policy, children will become millionaires before they get a job)

पॉलिसीबाबत खास गोष्टी

– एलआयसीची न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक प्लॅन पॉलिसी 25 वर्षांसाठी खरेदी केली जाते.
– मुलं 18 वर्षांची झाल्यावर पहिला हप्ता दिला जातो. दुसरा वयाच्या 20 व्या वर्षी आणि तिसरा वयाच्या 22 व्या वर्षी दिला जातो.
– जेव्हा मुलं 25 वर्षांची होतील तेव्हा त्याला संपूर्ण रक्कम परत मिळेल.
– पॉलिसी घेण्याकरीता मुलाचे वय शून्य ते 12 वर्षे असावे.
– या योजनेंतर्गत 60 टक्के रक्कम हप्त्यांमध्ये तर 40 टक्के मॅच्युरिटीच्या वेळी बोनससह मिळते.
– योजनेंतर्गत गुंतवणुकीसाठी किमान 1,00,000 रुपये असणे आवश्यक आहे.

कसे मिळतील 14 लाख

या योजनेत तुम्हाला दररोज 150 रुपये बचत करावे लागतील म्हणजे 55000 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. तुम्हाला हे 25 वर्ष करावे लागेल तुम्हाला एकूण 14 लाख रुपये जमा करावे लागतील. त्याचबरोबर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण 19 लाख रुपये मिळतात. परंतु हे लक्षात ठेवा की या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू न झाल्यास हा नियम लागू होईल. जर तुम्हाला पैसे काढायचे नसतील तर पॉलिसीच्या मॅच्युरिटीवरील व्याजासह तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळेल.

कशी घ्यायची पॉलिसी

पॉलिसीमध्ये गुंतवणूकीसाठी मुलाच्या पालकांचे आधार कार्ड, जर मुलाकडेदेखील आधार असेल तर त्याची प्रत, पालकांचे पॅनकार्ड आणि निवासाचा पुरावा आवश्यक असेल पॉलिसी धारकाची वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. पॉलिसी घेण्यासाठी फॉर्म कोणत्याही एलआयसी शाखेत भरावा लागेल किंवा आपण एजंटशी संपर्क साधू शकता. (Invest Rs 150 per day in this LIC policy, children will become millionaires before they get a job)

इतर बातम्या

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय, विम्याचा हप्ता किती, नोंदणी कधीपर्यंत सुरु, वाचा सविस्तर

दरेकरांची विधानं गोलमाल, शिवसेनेची एकाचवेळी भाजप-आघाडी पक्षांशी बोलण्याची कसरत सुरू : संजय आवटे