IRCTC Booking : घरबसल्या बुक करा बसचे तिकीट, IRCTC चा असा करा वापर

| Updated on: Jan 29, 2023 | 9:06 PM

IRCTC Booking : आता रेल्वेचेच नाही तर बसचे पण तिकीट तुम्हाला घर बसल्या बुक करता येईल.

IRCTC Booking : घरबसल्या बुक करा बसचे तिकीट, IRCTC चा असा करा वापर
Follow us on

नवी दिल्ली : आता बसचे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) ऑनलाईन बस बुकिंग सर्व्हिसच्या (Online Bus Booking Service) माध्यमातून तुम्हाला घर बसल्या आवडती सीट बुक करता येईल. IRCTC ने बस बुकिंगसाठी टुरिझम पोर्टलवर (IRCTC Tourism Portal) ही सुविधा मिळेल. ग्राहकाला
www.bus.irctc.co.in  या संकेतस्थळावर अथवा रेल्वे कनेक्ट अॅपच्या (Rail Connect App) माध्यमातून बसची बुकिंग करता येईल. 50 हजारांहून अधिक बसच्या बुकिंगची सुविधा मिळेल. या सेवेच्या माध्यमातून सरकारी आणि खासगी बसची बुकिंग करता येईल.

IRCTC ने ही सेवा जानेवारी 2021 मध्ये लाँच केली होती. सध्याच्या काळात 50 हजारांपेक्षा अधिक बसचे बुकिंग करण्याची सुविधा या सेवेच्या माध्यमातून मिळते. यामध्ये सरकारी आणि खासगी या दोन्ही बसचा समावेश आहे. ही सेवा 22 राज्य आणि 3 केंद्र शासीत प्रदेशात सेवा देते.

ग्राहकाला ही सेवा निवडताना अनेक पर्यायही मिळतात. त्यानुसार ग्राहकांना एसी, नॉनएसी आणि स्लीपर बसच्या पर्यायाची निवड करता येते. सीटची निवड बोर्डिंग आणि ड्रॉपिंग पॉईंट्सनुसार निवडता येते. त्याठिकाणाहून तुम्हाला बसमध्ये बसण्याची सुविधा मिळते.

हे सुद्धा वाचा

या बसचे तिकीट बुक करण्यासाठी www.bus.irctc.co.in वर जा. तुमच्या प्रवासाचे ठिकाण निवडा. प्रवासाचे गंतव्य स्थान, कुठंपर्यंत प्रवास करायचं आहे, त्याची नोंद करा. तुमच्या प्रवासाची तारीख निवडा. त्यानंतर त्या मार्गावरील बसचा पर्याय निवडावा लागेल.

एवढी महत्वाची माहिती दाखल केल्यानंतर तुमच्यासमोर विविध बसेसचा पर्याय, प्रवासाचा कालावधी, बसची येण्याची वेळ, बस निश्चित स्थानी पोहचण्याची वेळ यासर्वांची माहिती स्क्रीनवर दिसेल. तिकिटाची किंमत, किती सीट बुक करायची आहे, त्याची माहिती, तपशील द्यावा लागेल. त्यानंतर सीट निवडून प्रोसीड टू बुक या पर्यायावर क्लिक करावा लागेल. यासाठी तुम्हाला अगोदर IRCTC वर लॉगिन करावे लागेल.

बस दोन तास येण्यापूर्वीच तिचा क्रमांक, ड्रायव्हरचा मोबाईल क्रमांक आणि बोर्डिंग पॉईंट एसएमएस द्वारे तुम्हाला कळेल. खात्यातून रक्कम वळती झाल्यानंतर तिकीट बुक झाले नाहीतर 3-5 दिवसांत तुमची रक्कम खात्यात जमा होईल.

कोणत्याही तक्रारीसाठी 1800 110 139 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. एका प्रवाशाला प्रवासात 10 किलोचे सामान घेऊन जाता येते. सोबत 5 किलोपर्यंतची लॅपटॉप बॅग, हँडबँग, ब्रिफकेस घेऊन जाता येते. कोणत्याही कारणाने तिकीट रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.