IRCTC Push Notification Service : ट्रेनची कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी यापुढे तुम्हाला कोणतीही मेहनत करायची गरज भासणार नाही. तसेच एजंटला जास्त पैसे देऊन तिकीट बुक करायची किंवा इंटरनेटवर जाऊन चाचपणी करण्याचीही काही गरज नाही. कारण जर तुम्हाला देशविदेशात, धार्मिक किंवा पर्यटनस्थळी, तसेच सुट्टीदरम्यान फिरायला जायचे असल्यास IRCTC विशेष टूर पॅकेज जारी केले आहे. विशेष म्हणजे या पॅकेजसह तिकीटाची बुकींग, हॉटेल बुकिंग याची माहिती प्रवाशांना थेट त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. IRCTC Push Notification द्वारे प्रवाशांना ही माहिती मिळणार आहे. (IRCTC launches push notification service)
आयआरसीटीसी लवकरच प्रवाशांच्या आणि ग्राहकांसंबधीच्या कामाची माहिती त्यांना मिळावी, यासाठी पूश नोटिफिकेशन सर्व्हिस सुरु करणार आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नवीन रेल्वे, रिक्त जागा यांसह विविध माहिती देणार आहे. तसेच त्या रेल्वेत किती जागा रिकामी आहे, तुमची सीट कन्फर्म आहे का? यांसह इतर माहितीही मोबाईलच्या मॅसेजद्वारे मिळणार आहे.
यांसह इतर सुविधाही ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध याव्यात यासाठी आयआरसीटीसीतर्फे “पुश नोटिफिकेशन” सेवा देण्यात येणार आहे. ग्राहकांना या सेवेचा लाभ मिळावा यासाठी IRCTC ने मोबाईल तंत्रज्ञान संस्था मेसर्स मोमॅजिक टेक्नॉलॉजीशी करार केला आहे.
पूश नोटिफिकेशन म्हणजे एक पॉप-अप मेसेज असणार आहे. हा मेसेज तुम्हाला मोबाईल नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित माहिती लगेच मिळणार आहे. पर्यटन आणि तिकिटासंबंधित सेवांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आयआरसीटीसी आपल्या ग्राहकांना ही माहिती देणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांसाठी ही सेवा अगदी विनामुल्य असणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर याबाबची सर्व नोटिफिकेशन पाठवल्या जातील.
संबंधित बातम्या :
Coronavirus: मास्क घालून बोलण्यात अडचण येतेय, मग हा मास्क पाहाच
हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक पदकं काढली जाणार? वाचा सविस्तर