मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : रेल्वेची खानपान आणि तिकीट यंत्रणा सांभाळणारी कंपनी आयआरसीटीसी ( IRCTC ) कंपनीने रेल्वे प्रवाशांना सावधान केले आहे. ऑनलाईन तिकीटे काढणारे रेल्वे प्रवासी आयआरसीटीसीच्या एपचा सर्रास वापर करीत असतात. सायबर क्राईम करणारे रेल्वे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या बोगस मोबाईल एपची लिंक पाठवून प्रवाशांना लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत. काय आहे नेमके प्रकरण पाहूया..
अलिकडे एका बोगस एण्ड्रॉईड ऐप स्कॅमबद्दल आयआरसीटीसीने सावधान केले आहे. घोटाळेबाज आयआरसीटीसीची बोगस मोबाईल ऐपची लिंक पाठवून हा त्यांना टार्गेट करीत आहेत. आयआरसीटीसीने ईमेलद्वारे आपल्या कस्टमरला या खोट्या ऐपबद्दल माहीती दिली आहे. आयआरसीटीसीने युजरला माहीती देण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स ( आधी ट्वीटर ) वर माहीती दिली आहे.
बोगस ऐप तर वापरत नाही ना ?
IRCTC ने सांगितले की फेक मोबाईल ऐप कॅंपेन सुरु केले आहे. युजरला फसवण्यासाठी स्कॅमर्स एक फिशिंग लिंक पाठवून फशी पाडत आहेत. त्याद्वारे IRCTC Rail Connect मोबाईल ऐप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जात आहे. आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना सल्ला दिला आहे की या घोटाळेबाजाच्या दाव्याला भूलु नये. आयआरसीटीसी कंपनीने म्हटले आहे की ‘गुगल प्ले स्टोअर’ वा ‘एप्पल एप स्टोअर’ वरुनच आयआरसीटीसीची ऑफिशियली रेल कनेक्ट एप डाऊनलोड करावे. अधिक माहीतीसाठी आयआरसीटीसीचे अधिकृत वेबसाईट http://irctc.co.in वर दिलेल्या कस्टमर केअर क्रमांकाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आयआरसीटीसीचे हेच ते ट्वीट पाहा –
Alert: It has been reported that a malicious and fake mobile app campaign is in circulation where some fraudsters are sending phishing links at a mass level and insisting users download fake ‘IRCTC Rail Connect’ mobile app to trick common citizens into fraudulent activities.…
— IRCTC (@IRCTCofficial) August 4, 2023
irctc ने बोगस मोबाईल एपचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. काही जण नकली एपला असली समजून डाऊनलोड करु शकतात. त्यामुळे ही काळजी घ्या
– आयआरसीटीसीचे एप गुगल प्ले स्टोअर किंवा एप्पल एप स्टोअर वरुनच डाऊनलोड करावे.
– व्हाट्सअप किंवा अन्य मार्गाने मिळालेली कोणतीही लिंक ओपन करु नये, कोणतीही सरकारी कंपनी शक्यतो एप डाऊनलोड करण्यासाठी कधीही प्रवाशांना लिंक पाठवत नाही.
– ऑफर आणि डीस्काऊंटच्या मॅसेजच्या जाळ्यात येऊ नका ती लिंक ओपन करु नका यात फसवणूक होऊ शकते.