गिफ्टवर (Gift) टॅक्स (Tax) कधी लागणार हे दोन गोष्टींवर निर्भर असते. गिफ्टची किंमत किती आहे आणि गिफ्ट कोणाकडून मिळालं. निर्धारित रक्कमेच्यावर मिळणाऱ्या गिफ्टला आयकर विभाग (Income tax department) गिफ्ट न मानता उत्पन्न मानते. नियमानुसार 50 हजार रुपयांपर्यंतच्या गिफ्टवर कोणातही टॅक्स द्यावा लागत नाही. मात्र, मिळणारं गिफ्ट हे तुमच्या जवळच्या नातेवाईकाकडून मिळालेलं असावं. मित्रानं दिलेल्या गिफ्टवर टॅक्स द्यावा लागतो. एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपर्यंत मिळणाऱ्या गिफ्टवर कर द्यावा लागत नाही. गिफ्टची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास टॅक्स द्यावा लागतो. याचा अर्थ असा होत नाही की 5० हजार रुपयांच्या गिफ्टवर टॅक्समध्ये सवलत मिळते. वर्षभरात 50 हजार रुपयांहून अधिक किंमतीचे गिफ्ट मिळाले असतील तर टॅक्स द्यावा लागतो. तुम्हाला मिळणारं एक गिफ्ट 60 हजार रुपयांचं आहे तर त्यावर टॅक्स लागेल आणि दुसरं गिफ्ट 40 हजार रुपयांचं असेल तर टॅक्स लागणार नाही, असं होत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला संपूर्ण एक लाख रुपयांच्या गिफ्टवर टॅक्स द्यावा लागतो.
आयकर विभागानं जारी केलेल्या यादीनुसार जवळचे नातेवाईक तुम्हाला कितीही किमतीचे गिफ्ट देऊ शकतात त्यावर टॅक्स लागत नाही. नातेवाईकांच्या यादीत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी, बहिण-भाऊ, काका-काकू, मामा-मामी, मावशी-काका, आत्या-मामा, पत्नीचे बहिण- भाऊ किंवा पतीचे बहिण भाऊ यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या गिफ्टवर टॅक्स द्यावा लागत नाही. जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर जणांकडून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचं गिफ्ट मिळालं असल्यास त्यावर टॅक्स द्यावा लागतो. पती पत्नीला कितीही किंमतीचे टॅक्स फ्री गिफ्ट देऊ शकतो. मात्र, आयकर विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीकडून दिवसभरात दोन लाखांपर्यंत रोख रक्कम गिफ्ट म्हणून घेण्याची सुविधा आहे. त्यामुळे पतीनं पत्नीला गिफ्ट देताना एकाच दिवशी दोन लाखांपर्यंतच टॅक्स फ्री गिफ्ट द्यावं, असं आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला आहे. चेक किंवा रोख स्वरुपात जमीन, फ्लॅट अशी कोणतीही स्थावर मालमत्ता, दागिने, शेअर, पेटिंग किंवा इतर महागडे गिफ्ट ज्याची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यावर टॅक्स द्यावा लागतो.
काही खास प्रसंगासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या गिफ्टवर टॅक्स लागत नाही. उदाहरणार्थ लग्नात मिळणाऱ्या महाग गिफ्टवर टॅक्स लागत नाही. मग तुम्हाला मिळणारं गिफ्ट नातेवाईकांकडून मिळालेलं असो किंवा मित्रांकडून अथवा ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून. मात्र, हे गिफ्ट लग्नाच्या तारखेच्या जवळपास दिलेलं असावं. वाढदिवस किंवा लग्नाच्या वाढदिवशी मिळणाऱ्या गिफ्टवर मात्र टॅक्समध्ये सवलत मिळत नाही. वारसाहक्कातून मिळालेल्या पैशांवरसुद्धा टॅक्स लागत नाही. तसेच सेवाभावी संस्था, विद्यापीठ किंवा ट्रस्टकडून पैसै मिळाले असल्यास त्यावर टॅक्स लागत नाही. आयकर कायदा 56 अन्वये गिफ्टला उत्पन्नाचं इतर स्रोत समजला जातो. गिफ्ट घेणाऱ्याच्या उत्पन्नात याची नोंद होते. ज्या व्यक्तीला गिफ्ट मिळालं त्याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी असते. मात्र काहीवेळा गिफ्ट देणाऱ्याला सुद्धा टॅक्स द्यावा लागतो.
कोरोनाचा प्रभाव वसरला; सोन्याची विक्रमी आयात, 2021 मध्ये 27 टक्क्यांची वाढ