नवी दिल्ली : डेटा लोन (Data Loan) या नवीन सेवेबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच. जिओ कंपनी (JIO Company) ही त्यांच्या वापरकर्त्यांना (Users) ही सेवा देत होती. पण कंपनीने ही सेवा अचानक बंद केली आहे. म्हणजे ग्राहकांना आता डेटा लोन सेवेचा लाभ मिळणार नाही. जिओने ही सेवा का बंद केली, याविषयीची कोणतीही माहिती दिली नाही. अत्यावश्यक (Emergency) वेळी ही सेवा ग्राहकांच्या अत्यंत उपयोगी पडत होती.
JIO Data Loan या योजनेत ग्राहकांना 2GB डाटा उधार मिळत होता. अचानक डाटा संपल्यावर ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येत होता. त्यासाठी ग्राहकांना 25 रुपये अतिरिक्त मोजावे लागत होते. सध्या कंपनीने ही सेवा बंद केली आहे.
कंपनीच्या मते, डेटा लोन सेवा तात्पुरत्या काळासाठी उपलब्ध नाही. ही सेवा बंद झाल्याने ग्राहक मात्र संभ्रमात आहेत. हा प्लॅन अचानक बंद करण्यामागे कंपनीचे धोरण काय आहे, ते समजून घेऊयात..
जिओ डेटा लोनसाठी ग्राहकांना MY JIO या अॅपमध्ये जावे लागत होते. याठिकाणी जिओ क्रमांकावरुन लॉग इन करावे लागत होते. टॉप लेफ्ट मेन्यूमध्ये डेटा लोनचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध होता. त्यावर क्लिक केल्यावर ग्राहकांना डेटा लोन सेवा मिळत होती.
सध्या कंपनीने ही सेवा अचानक बंद केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वेळी ग्राहकांना डाटा रिचार्ज करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याना उधारीत डाटा मिळत नाही. त्यांना त्यासाठी प्लॅन रिचार्ज करावा लागतो.
पूर्वी ग्राहकांना जिओ अॅपमध्ये मिळणारा हा पर्याय आता मिळत नाही. वापरकर्त्यांनी हा पर्याय शोधल्यावर त्यांना ही सेवा तात्पुरती बंद केल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्राहकांना इतर रिचार्ज प्लॅनवर अवलंबून रहावे लागत आहे.
ही सेवा का बंद करण्यात आली. याची माहिती कंपनीने अधिकृतरित्या दिलेली नाही. पण ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आल्याची माहिती अॅपवर उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना आता व्हाउचरवर अवलंबून रहावे लागते.
जरा डाटा संपला तर, ग्राहकांना डाटा व्हाऊचर हाच पर्याय उरतो. जिओच्या डाटा व्हाऊचरची सुरुवात 15 रुपयांने होते. त्यामध्ये ग्राहकाला 1GB डाटाचा मिळतो. तर 2GB डाटासाठी ग्राहकांना 25 रुपये खर्च करावे लागणार आहे.