नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : भारतीय अर्थव्यवस्था जोमात आणि अनेक अर्थव्यवस्था कोमात अशी अवस्था आहे. अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये कपातीचे धोरण सुरु आहे. तर अनेक स्टार्टअप्सने तर घोर निराशा केली आहे. मोठा निधी जमवून, शासनाकडून सवलती पदरात पाडून या स्टार्टअप्सने गल्ला जमावला. मोठी भरती प्रक्रिया राबवली. पण अवघ्या एक-दोन वर्षांतच कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा पायंडा त्यांनी सुरु केला आहे. अनेक स्टार्टअप्स तर गुंडाळण्याची वेळ आलेली आहे. कंपन्यांनी नोकर भरतीचे नियम बदलवले आहेत. आयटीसह अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना (Lay Off) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण आता नोकरी गमावण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. या पर्यायामुळे पुढील नोकरी मिळेपर्यंत काही दिवस तरुणांना आर्थिक मदत मिळेल.
काय आहे हा विमा
जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर (Job Loss Insurance Cover) अशा पडत्या काळात महत्वाचा ठरतो. बाजारात अशा प्रकारचा विमा दाखल झाला आहे. अनेक कंपन्या त्यासाठी ऑफर घेऊन आल्या आहेत. या कंपन्या लिंक्ड विमा देत आहेत. अजून हा स्वतंत्र विमा नाही तर एक रायडर आहे. म्हणजे इतर विमा पॉलिसीसोबत तुम्ही हा विमा घेऊ शकता. हे रायडर विमा योजनेसोबत जोडू शकता. प्रत्येक विमा कंपनीचे त्यासाठी वेगवेगळ्या अटी व शर्ती आहेत.
या गोष्टी ठेवा लक्षात