नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेसोबत (SBI) कमाईची संधी चालून आली आहे. जर तुमच्याकडे भांडवल (Capital) नसले तरी घाबरण्याचे कारण नाही, तुम्हाला व्यवसाय करता येऊ शकतो. अर्थात या व्यवसायासाठी (Business) तुमच्याकडे पैसा नसला तरी जागा मात्र हवी. मोक्याची जागा असेल तर तुम्हाला अधिक फायदा होईल.
स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात एटीएम वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी मोक्याच्या जागा शोधण्यात येत आहे. ग्राहकांना पैसे काढण्यासाठी शाखेत न येत्या त्यांच्याच भागात रक्कम मिळावी यासाठी हा खटाटोप सुरु आहे.
एसबीआय तुमच्याभागात एटीएम सुरु करण्यासाठी तुम्हाला भाड्याच्या रुपात मोठी रक्कम देणार आहे. पण त्यासाठी काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन तुम्हाला करावा लागेल.
जर तुम्हाला या संधीचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला बँकेकडे रीतसर अर्ज करावा लागणार आहे. या योजनेत तुम्हाला घरबसल्या महिन्याला जवळपास 60,000 रुपयांपर्यंत कमाई करता येईल.
एसबीआयने यासाठी काही अटी व शर्ती ठेवल्या आहेत. त्याची तुम्ही पुर्तता केली तर, तुमच्या खात्यात एसबीआय महिन्याला 60,000 रुपये जमा करेल.
एसबीआय एटीएमसाठी तुम्हाला 50-80 फूट जागा असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या एटीएमपासून तुमची जागा 100 मीटर दूर असली पाहिजे. जागा एकदम दर्शनी भागात हवी. याठिकाणी 24 तास वीज उपलब्ध हवी.
या सर्व अटी व शर्ती तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला सहजच एटीएम मिळेल. महिन्याला तुम्हाला 60,000 रुपये मिळतील. म्हणजे वर्षाला तुम्हाला 7.20 लाख रुपये मिळतील. पण यासाठी दर्शनी भागात जागा असणे आवश्यक आहे.
तर ज्या कंपन्या एसबीआयच्या एटीएमची फ्रॅन्चायजी देतात त्यांच्याकडे तुम्हाला अर्ज करावा लागेल. यामध्ये टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन या कंपन्यांशी संपर्क करता येईल.