मुंबई | पीएफधारकांसाठी अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी आहे. पीएफ होल्डर व्याजाच्या प्रतिक्षेत आहेत. चालू आर्थिक वर्षातील शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र त्यानंतरही पीएफधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झालेली नाही. खातेधारक सोशल माीडियाच्या माध्यमातून ट्विटरकडे याबाबत तक्रार करत आहे. ईपीएफओने या तक्रारीवर व्याजाबाबत माहिती दिली आहे. सरकारने सुरु आर्थिक वर्षासाठी पीएफवरील रक्कमेसाठी 8.1 टक्के व्याजदर निश्चित केला आहे.
“व्याजाची रक्कम पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे”, असं उत्तर पीएफओने ट्विटरवरून करण्यात आलेल्या तक्रारीला दिलं. इपीएफओच्या या उत्तरामुळे असंख्य पीएफधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे लवकरच पीएफधारकांची व्याजाची प्रतिक्षा संपणार आहे. पीएफ व्याजाची रक्कम ही सातत्याने उशिराने मिळत असल्याने खातेधारक चिंतेत होते.
केंद्र सरकारकडून अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान सरकारने पीएफधारकांना मोठा दिलासा दिला. सरकारने पीएफ रक्कमेवरील टीडीएसमध्ये 10 टक्क्यांनी घट केली. याआधी 30 टक्के टीडीएस लागायचा, जो आता 20 टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पॅन कार्ड-पीएफ खात्यासह लिकं नसलेल्या पीएफधारकांना मोठा दिलासा मिळाला.
मार्च 2022 मध्ये पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात .4 ने घट करण्यात आली. त्यामुळे तेव्हा पीएफ खात्यावरील व्याजदर 8.1 इतका झाला. हा व्याजदर गेल्या 40 वर्षातील निच्चांकी दर ठरला. याआधी 1977-78 साली व्याजदर हा 8 टक्के निश्चित करण्यात आला होता. यानंतर सातत्याने व्याजदर हा 8.25 किंवा त्यापेक्षा अधिक होता. व्याजदर 2018-19 मध्ये 8.65, 2017-18 मध्ये 8.55, 2016-17 मध्ये 8.65 आणि 2015-16 मध्ये 8.8 या दराने व्याज देण्यात आला.
कर्मचाऱ्याच्या वेतनातून 12 टक्के समभाग हा पीएफ म्हणून कापला जातो. कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात आलेल्या भागापैकी 8.33 टक्के भाग हा इपीएस अर्थात कर्मचारी पेन्शन योजना आणि 3.67 टक्के रक्कम ही इपीएफमध्ये जमा केली जाते.