नवी दिल्ली : जुलै महिना सुरु झाला आहे. 31 जुलै 2023 रोजी आयकर रिटर्न फाईलिंग करण्याची अंतिम मुदत आहे. म्हणजे आता करदात्यांकडे (Taxpayers) फार कमी कालावधी उरला आहे. शेवटच्या दिवसात वेबसाईट हँग होण्याचे, सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार गेल्यावर्षी आपण अनुभवले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आयटीआर भरणे आवश्यक आहे. पण करदात्यांनी आयटीआर फाईल करण्याची नसती घाई करु नये. आयटीआर भरताना सतत काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच ITR Form-1 फाईल करताना काळजी घ्यावी लागते. नाहीतर एक चूक पण तुम्हाला भारी पडू शकते.
आयटीआर फॉर्म 1
आयटीआर फॉर्म 1 हा सर्वाधिक वापरण्यात येणारा अर्ज आहे. सर्वसाधारणपणे नोकरदार वर्ग या फॉर्मचा कर भरणा करण्यासाठी वापर करतो. आयकर विभागानुसार, आयटीआर फॉर्म 1 हा सर्वात सोपा फॉर्म आहे. त्याचा वापर नोकरदार वर्ग करतो.
या सर्वांसाठी हाच फॉर्म
भारतातील सर्वसाधारण करदात्याकडून आयटीआर फॉर्म 1 दाखल करण्यात येतो. हा फॉर्म अनेक लोकांसाठी उपयोगी पडतो. ज्यांचे उत्पन्नाचा स्त्रोत पगार, लाभांश, बँकेतील व्याज, घर, मालमत्ता अथवा शेतीतून वार्षिक 5000 रुपयांपेक्षा नाही. त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. वार्षिक 50 लाख रुपयांपर्यंत पगारातून उत्पन्न कमाविणारे नोकरदारांना हा फॉर्म आहे.
कोण नाही भरु शकत
टीडीएसचा नियम
याशिवाय बँकेतून रोख रक्कम काढताना कलम 194 एन अंतर्गत टीडीएस शुल्क आकारण्यात येत असेल तर तुम्हाला ITR-1 भरता येणार नाही. हिंदू अविभक्त कुटुंबे (HUFs) ITR-1 फाईल करु शकत नाही.
आयटीआर-1 फाईल केल्यास फटका
जर एखाद्याने चुकून आयटीआर-1 फाईल केल्यास काय होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला आयकर खात्याकडून नोटीस येऊ शकते. नोटीस आल्यानंतर तुम्हाला 15 दिवसांच्या आत सुधारीत आयटीआर दाखल करावे लागेल. तुम्ही सुधारीत आयटीआर दाखल न केल्यास, दाखल आयटीआर अमान्य करण्यात येईल.