नवी दिल्ली : पुण्यातील रुपी बँकेचा (Rupee Bank) परवाना रद्द (License Cancelled) करण्यात आला होता. काल ही बँक कायमची बंद झाली. या बँकेला 100 वर्षांहून अधिक काळ लोटला होता. पण अनियमितता आणि ताळेबंदातील तफावतीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेवर (RBI) कारवाई केली.
आता RBI ने राज्यातीलच सोलापूर येथील बँकेला कुलूट ठोकाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, सोलापूर येथील द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार, खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
सध्या ही बँक खातेदारांचे हित जपू शकत नाही. या बँकेचे कामकाज सुरु ठेवले असते, तर खातेदार आणि गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान झाले असते. त्यांची फसवणूक टाळण्यासाठी बँकेचा परवाना रद्द केल्याचे स्पष्टीकरण आरबीआयने दिले आहे.
सध्या या बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच बँकेकडे उत्पन्नाचे साधन ही नाही. बँकेकडून कर्ज वसूल होऊ शकत नाही. त्यामुळे या बँकेचे काम थांबवण्यात आले आहे. बँकेतील ठेवीदारांचे हित संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बँकेच्या ठेवीदारांना, खातेदारांना आता 5 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम मिळेल. ग्राहकांना त्यासाठी डिपॉझिट इन्शरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायद्यातंर्गत ( DICJC Act 1961) पुढील कारवाई करावी लागणार आहे.
या बँकेतील ग्राहकांचे अनेक शाखांमध्ये खाते असेल तर सर्व खात्यांमधील ठेव मोजली जाईल. त्यावरील व्याज मोजल्या जाईल. केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची मदत मिळेल. केंद्रीय बँकेच्या मते, 95 टक्के ग्राहकांची रक्कम या विमा रक्कमेच्या आताच आहेत. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेल.
यापूर्वी आरबीआयने गेल्या महिन्यात 8 सहकारी बँकांवर कारवाई केली होती. त्यांना दंड ठोठावला होता. विशाखापट्टनम को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने 55 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच कर्नाळा नागरी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाही रद्द केला आहे.