Image Credit source: LIC India
मुंबई : एलआयसीच्या बहुप्रतिक्षित आयपीओची (IPO) अखेर घोषणा करण्यात आली आहे. आयपीओबाबत एलआयसी मंडळाची बैठक मंगळवारी पार पडली होती. या बैठकीत आयपीओबाबत घेण्यात आलेला निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गुंतवणुकदारांना (Investors) 902 ते 949 रुपये या दरम्यान प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओत एका खंडात 15 शेअर असणार आहेत. याचाच अर्थ तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर 15 शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. याला (LIC) 3.0 फेज असं नाव देण्यात आलं आहे. एलआयसीच्या आयपीओला चार मे 2022 पासून सुरुवात होणार आहे. तर 9 मे 2022 ही क्लोजिंग डेट असणार आहे. एलआयसी मंडळाने या आयपीओसाठी कर्मचा-यांना 45 रुपये तर विमाधारकांना 60 रुपये सवलत जाहीर केली आहे. म्हणजे तुम्ही जर एलआयसीचे विमाधारक असला किंवा कर्मचारी असाल तर तुम्हाला या शेअर खरेदीमध्ये 45 ते 60 रुपयांची सुट मिळू शकते. एलआयसीचा हा आयपीओ नेमका कसा असणार समजून घेऊयात महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे
- या आयपीओच्या माध्यमातून केंद्र सरकार एलआयसीमधून आपला 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे, म्हणजेच एलआयसी 22. 13 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे.
या आयपीओची प्राईस बँड 902 ते 949 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे.
- या आयपीओच्या एका खंडात 15 शेअर्स असणार आहे, म्हणजेच जर तुम्हाला एलआयसीच्या आयपीओमध्ये गुतंवणूक करायची असल्यास कमीत कमी 15 शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत.
- आयपीओला चार मे 2022 पासून सुरुवात होणार आहे. तर 9 मे 2022 ही आयपीओची क्लोजिंग तारीख असणार आहे.
- तुम्ही जर एलआयसीचे कर्मचारी किंवा विमाधारक असाल तर तुम्हाला प्रति शेअरमागे 45 ते 60 रुपयांची सूट मिळू शकते
- 22. 13 कोटी शेअर्सपैकी काही शेअर्स हे पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवून, उरलेले शेअर्स हे पात्र संस्था, रिटेल गुंतवणूकदार आणि बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदार यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- यापैकी 50 टक्के शेअर्स हे पात्र संस्थासाठी असतील, 35 टक्के शेअर्स हे रिटेल गुंतवणूकदार तर 15 टक्के शेअर्स हे बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदांना उपलब्ध करून देण्यात येतील.
- तुम्हाला जर शेअर्सचा लॉट खरेदी करायचा असेल तर कमीत कमी 14,235 रुपयांची गुंतवणूक करवी लागेल, मात्र एलआयसी कर्मचाऱ्याला 45 रुपयांची सूट मिळाल्याने त्याला हा 15 शेअर्सचा लॉट खरेदी करण्यासाठी 13,560 रुपयेच द्यावे लागणार आहेत.