मुंबई : देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा (LIC) आयपीओ चार मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. भारतीय आयुर्विमा महांडळाच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) साठी बोली लावल्यानंतर आता सर्वांचे डोळे हे आयपीओच्या वाटपाकडे लागले आहेत. दरम्यान आज एलआयसीच्या शेअर्सचे वाटप होऊ शकते. ज्यांनी आयपीओसाठी अर्ज केला आहे, ते बीएसई वेबसाइटवर किंवा रजिस्ट्रार केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर एलआयसीच्या आयपीओ वाटपाबाबतची स्थिती जाणून घेऊ शकतात. तसेच शेअर्स (Shares) ऑनलाईन खरेदी करू शकतात. एलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. एलआयसी आयपीओला जवळपास तीन पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एलआयसी कर्मचारी आणि विमाधारकांचा या आयपीओला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.
एलआयसीच्या आयपीओसाठी ज्यांनी बोली लावली त्यांना घर बसल्या आयपीओ वाटपाची स्थिती ऑनलाईन पहाता येणार आहे. त्यासाठी त्यांना बीएसईच्या अधिकृत वेबसाइट bseindia.com किंवा केफिन टेकची वेबसाईट karisma.kfintech.com वर लॉगइन करावे लागणार आहे. या दोन्ही वेबसाईटवर बोलीदारांना एलयासीच्या आयपीओ वाटपाची स्थिती पहाता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला वरीलपैकी कोणत्यातरी एका वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. तीथे लॉगइन करून एलआयसी आयपीओचा अर्ज क्रमांक समाविष्ट करावा लागणार आहे. त्यानंतर तुमचा आवश्यक तपशील पॅनची माहिती समाविष्ट करा. त्यानंतर तुम्ही आयपीओ संदर्भातील माहिती पाहू शकातात.
देशातीलस सर्वात मोठा आयपीओ असलेल्या एलआयसीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी चार मे रोजी खुला करण्यात आला होता. तर नऊ मे रोजी बंद करण्यात आला. आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी एलआयसीच्या विमाधारकांना आयपीओमध्ये शेअरमागे तब्बल साठ रुपयांची सूट देण्यात आली होती, तर एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना शेअरमागे 45 रुपयांची सूट देण्यात आली आहे. सुट मिळाल्यामुळे विमाधारक आणि कर्मचाऱ्यांनी आयपीओसाठी मोठ्या प्रमाणात बोली लावली आहे.