नवी दिल्ली : एलआयसीची जीवन तरुण योजना (LIC Jeevan Tarun Policy) मुलांच्या भविष्यासाठी एकदम जोरदार आहे. ही योजना विमा संरक्षण आणि बचत वैशिष्ट्यासह येते. तुमच्या मुलाच्या भविष्यातील खर्चाची तरतूद तुम्हाला करायची असेल. शिक्षणाच्या खर्चाची (Educational Expenditure) चिंता असेल तर ही योजना फायदेशीर ठरते. या योजनेनुसार, तुमच्या मुलाचे वय 20 ते 24 होईल, तेव्हा वार्षिक अनुषांगिक लाभ आणि 25 व्या वर्षी मॅच्युरिटीचे लाभ (Maturity Benefits) देण्यात येतात. त्यामुळे मुलांचा शैक्षणिक खर्च आणि इतर गरजा पूर्ण करता येतात.
जीवन तरुण योजनेत कमाल मूळ रक्कम 75,000 रुपये आणि सम-अॅश्युर्ड बेसिक अमाऊंटची मर्यादा नाही. 75,000 रुपये ते 100,000 रुपयांच्या सम अॅश्युर्ड अमाऊंटसाठी 5,000 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. त्यानुसार योजनेचा फायदा घेता येतो.
तर 100,000 रुपयांपेक्षा अधिकच्या रक्कमेसाठी 10,000 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत 90 दिवसाच्या लहान बालकापासून ते 12 वर्षापर्यंतच्या मुलाच्या नावे गुंतवणूक करता येते. या योजनेच्या मॅच्युरिटीचे वय 25 वर्षे आहे. तर प्रिमिअम पेइंग टर्म (PPT) 20 वर्ष आहे.
जीवन तरुण योजनेत तुम्हाला बोनसचा फायदा मिळतो. या योजनेतंर्गत तुम्हाला 4 पर्याय मिळतात. मुलाचे वय 20 वर्ष झाल्यानंतर पुढे योजनेतंर्गत चार वेळा निश्चित रक्कम देण्यात येते. हा बोनस वार्षिक असतो. त्यानंतर मॅच्युरिटीची रक्कम मिळते.