नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation) ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. देशभरातील कोट्यवधी नागरिकांकडे एलआयसीची पॉलिसी आहे. अनेकजण उत्साहात एलआयसीची पॉलिसी (Insurance Policy) सुरु करतात. अडचणी येतात अथवा पैसा भरणे जमत नाही. मग पॉलिसी बंद पडते. ही बंद पडलेली पॉलिसी तुम्हाला पुन्हा सुरु करता येते. त्यासाठी एलआयसीने (LIC) सुविधा दिली आहे. त्यासाठी एलआयसी सातत्याने मोहिम राबवत असते. एलआईसीने 1 ते 30 सप्टेंबर, 2023 या दरम्यान लॅप्स पॉलिसी पु्न्हा सुरु करण्यासाठी एक खास मोहिम सुरु केली आहे. तुमची पण एखादी पॉलिसी बंद असेल आणि ती सुरु करायची इच्छा असेल तर काही रक्कम जमा करुन ही पॉलिसी पुन्हा सुरु करकता येते.
विम्याचे मिळते संरक्षण
देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी एलआयसी वेळोवेळी अशी योजना राबविते. या योजनेतून गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होतो. त्यामुळे एलआयसीच्या योजनेवर अजून गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. एलआयसी योजनाचा सर्वात चांगला फायदा म्हणजे, बचतीसह गुंतवणूकदाराला विम्याचे संरक्षणही मिळते. त्याला मॅच्युरिटी कालावधीनंतर सर्व फायदे तर मिळतातच, पण पुढे पाच ते दहा वर्ष विम्याचे संरक्षण सुरुच राहते.
लॅप्स पॉलिसी करा सुरु
भारतीय जीवन विमानुसार, जर एखाद्या विमाधारकाने हप्ता जमा केला नाहीतर त्याची पॉलिसी बंद पडते. अशावेळी तो त्यांची पॉलिसी पुन्हा सुरु करु शकतो. पण ग्राहकाला थकीत रक्कमेवर काही शुल्क अदा करावे लागते. शुल्क अदा केल्यानंतर बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करता येईल. या पॉलिसीसोबत असलेले सर्व लाभ तुम्हाला मिळतील.
बंद पडलेली पॉलिसी अशी करा सुरु
जर तुमची एलआयसी पॉलिसी बंद झाली असेल तर ती पुन्हा सुरु करता येईल. त्यासाठी एलआयसी कार्यालय, एजंटशी संपर्क साधता येईल. एलआयसी कस्टमर केअर, ई-मेल आता एपच्या सहायाने विचारणा करता येईल. सर्वात अगोदर ग्राहकाला एलआयसीच्या कार्यालयात जाऊन पॉलिसी सुरु करण्यासाठी रिव्हाईल फॉर्म जमा करावा लागेल. त्यासोबत विलंब शुल्क आणि दंड जमा करावा लागेल. त्यानंतर बंद पडलेली पॉलिसी सुरु होईल.
नियम काय
एलआयसी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करण्यासाठी अट आणि नियमांचे पालन करावे लागेल. त्यानुसार अनपेड प्रीमियमची तारीख पाच वर्षांच्या आत नुतनीकरण करण्यात येईल. प्रीमियम भरताना तो ऑनलाईन भरल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे विलंब शुल्क भरताना त्याचा फायदा घेता येईल.