शेअर बाजारात (stock market) लिस्ट झाल्यानंतर एलआयसीच्या (LIC) अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सुरुवातीला IPO गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आता रिटेल गुंतवणूकदार (Retail investors) तोंडावर पडले आहेत.एलआयसीची लिस्टिंग होऊन अडीच महिने झालेत. या कालवधीत सुमारे दोन लाखांहून अधिक किरकोळ गुंतवणुकदार शेअर्स विकून एलआयसीमधून बाहेर पडलेत. लिस्टिंगच्या दिवशी जवळपास 39.86 लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती, आता त्यांची संख्या 37.65 लाखांवर आलीये.फक्त किरकोळ गुंतवणूकदारच नाही तर परदेशी गुंतवणूकदारही LIC मधून बाहेर पडत आहेत. लिस्टिंगच्या वेळी 59 परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती आता ही संख्या 47 वर आलीये. लिस्टिंगपासूनच एलआयसीनं गुंतवणूकदारांना निराश केलंय. मग ते गुंतवणूकदार किरकोळ असो की संस्थात्मक. प्रत्येकालाच निगेटिव्ह रिटर्न मिळालाय. LIC आयपीओची इश्यू किंमत 889 रुपय ते 949 रुपये ठेवण्यात आली होती. सध्या एलआयसीच्या शेअर्सचा भाव 700 रुपयांच्याही खाली आहे.त्यामुळे गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फटका बसला आहे.
असं नाही की सर्वच गंतवणूकदार एलआयसीच्या घसरणीमुळे घाबरलेले आहेत. LIC च्या शेअर्सचा भाव कमी झाल्यानं अनेक गुंतवणूकदार पोर्टफोलिओमध्ये LIC ची हिस्सेदारी वाढवत आहेत. म्युच्युअल फंडाची गुंतवणूक पाहा. एलआयसीचा शेअर लिस्ट झाल्यानंतर 19 म्युच्युअल फंडानी गुंतवणूक केली होती आता एकूण 100 म्युच्युअल फंडांनी एलआयसीमध्ये गुंतवणूक केलीये. सामान्य गुंतवणूकदारांमधील अनुभवी गुंतवणूकदार खालच्या स्तरावर एलआयसीचे शेअर्स खरेदी करत आहेत.त्यामुळेच एलआयसीमध्ये लहान गुंतवणूकदारांची संख्या कमी झालीये. अनेक ब्रोकिंग कंपन्या खालच्या स्तरावर एलआयसीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
2023-24 वर्षातील अंदाजित एंटरप्राइस व्हॅल्युनुसार एलआयसीचा शेअर्स खूप स्वस्त आहे. तसेच नवीन व्यवसायाची किंमतही अंदाजापेक्षा 34 टक्क्यांहून अधिक आहे.830 रुपयांचे लक्ष ठेऊन एलआयसीच्या शेअर्सची खरेदी करू शकता, असा सल्ला मोतीलाल ओसवाल यांनी दिलाय. इतर विमा कंपन्यांच्या शेअर्सची तुलना करता एलआयसीचा शेअर्स सर्वाधिक स्वस्त आहे. बाजार शेअर्सला चांगली किंमतही देत नाही. तरीही बँक ऑफ अमेरिका अद्यापही एलआयसीला आऊरपरफार्मिंग रेटिंग देत आहे. त्यामुळे दीर्घकालावधीसाठी एलआयसीचा शेअर 930 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.