तुमचं आधारकार्ड हरवलंय आणि 12 अंकी नंबरही लक्षात नाही! मग असं मिळवाल सर्वकाही; जाणून घ्या

| Updated on: Nov 22, 2024 | 4:34 PM

आधारकार्ड हे सरकारी कामात अतिशय आवश्यक असलेले कागदपत्र आहे. पण अनेकदा निष्काळजीपणामुळे आधारकार्ड हरवलं. इतकंच काय तर त्यावरील 12 अंकी नंबरही लक्षात नसतो. मग अशावेळी आधारकार्ड आणि नंबर कसा मिळवायचं हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तर यावर एक तोडगा आहे आणि पुढे त्याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

तुमचं आधारकार्ड हरवलंय आणि 12 अंकी नंबरही लक्षात नाही! मग असं मिळवाल सर्वकाही; जाणून घ्या
Follow us on

आधारकार्ड हे महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. या ओळखपत्राची आवश्यकता सर्वच सरकारी कामात असते. आधारकार्डवर व्यक्तीचं नाव, पत्ता आणि जन्म दिनांक असते. युआयडीएआयच्या नियमानुसार आधारकार्ड एकदाच बनवता येते. त्यामुळे आधारकार्डात बदल करण्यासाठी काही नियम तयार केले आहेत.आधारकार्डवरील दुरुस्ती करण्यासाठी किंवा आधारकार्ड खराब झालं असेल तर ते नव्याने काढण्याची सुविधा आहे. पण आहे त्याच आधार क्रमांकाने हे आधारकार्ड तयार होतं. त्यामुळे नव्या आधार नंबरने आधारकार्ड तयार करता येत नाही. पण समजा तुमचं आधारकार्ड हरवलं आहे आणि तुम्हाला त्यावरील 12 अंकी नंबरही लक्षात नाही. अशावेळी नेमकं काय करायचं हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. मग आता आधारकार्ड कसं तयार करायचं हा प्रश्न पडला असेल तर त्याचा तोडगा तुम्हाला पुढे मिळेल.

आधारकार्ड बनवताना सदर व्यक्तीचे फिंगर प्रिंट्स आणि आयरिस स्कॅन केले जातात. त्याचबरोबर सदर व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी त्यावर रजिस्टर केला जातो. त्यामुळे आधारकार्ड हरवलं तर मोबाईल नंबर किंवा जीमेल आयडीच्या माध्यमातून आधार नंबर मिळवू शकता. त्या आधार नंबरच्या माध्यमातून तुम्ही नवं आधार कार्ड मिळवू शकता. यासाठीची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

या स्टेप्स फॉलो करा

  • युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर जा
  • Aadhaar Services वर क्लिक करून Retrieve Lost or Forgotton EID/UID च्या ऑप्‍शनवर क्लिक करा.
  • यानंतर तिथे मागितलेली सर्व माहिती भरा आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा.
  • यानंतर एक ओटीपी तुमच्या रजिस्टर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर येईल
  • ओटीपी सदर बॉक्समध्ये टाका आणि लॉग इन बटणावर क्लिक करा
  • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबर रजिस्टर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर येईल.
  • यानंतर नव्या आधारकार्डसाठी अर्ज करू शकता.
  • तुम्ही जवळ्या आधार केंद्रावर जाऊनही हे काम करू शकता.

आधार नंबर मिळवण्याची दुसरी पद्धत

तुम्ही आधार नंबर मिळवण्यासाठी टोल फ्री नंबरची मदत घेऊ शकता. टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करा. तिथे सांगितलेल्या सूचनांचं पालन करा आणि तिथल्या कर्मचाऱ्याशी बोलण्याचा पर्याय निवडा. यावेळी तिथला कर्मचारी तुम्हाला काही प्रश्न विचारेल. त्याची योग्य उत्तर द्या. यानंतर आधारचे डिटेल्स पाठवले जातील. या नंबर आधारे तुम्ही डुप्लिकेट आधारकार्डसाठी अप्लाय करू शकता.