नवी दिल्लीः महागाईच्या तीव्र (High Inflation) झळा सर्वसामान्यांना सहन कराव्या लागत आहेत. दिवसागणिक वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas cylinder) किंमतीत 135 रुपयांनी घट करण्यात आली आहे. एलपीजी सिलेंडर खरेदी करणाऱ्या हॉटेल, ढाबे तसेच रेस्टॉरंट मालकांना 135 रुपये कमी अदा करावे लागतील. राजधानी दिल्लीत एलपीजी सिलिंडर 2219 रुपयांना उपलब्ध असेल. कोलकातामध्ये 2322, मुंबईत 2171.50 रुपये आणि चैन्नई येथे 2373 रुपयांना उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. तीन महिन्यातील दर कपातीची पहिली वेळ आहे. रशिया-यूक्रेन विवादाचा फटक्यामुळे कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाली होती. त्यामुळे भारतावर त्याचा थेट परिणाम जाणवला. भारतीय कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली. एक मेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 102.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. एक एप्रिलला 250 व मार्च महिन्यात 105 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
व्यावसायिक गॅस सिलिंडर दराच्या कपातीनंतर घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर घटण्याची अपेक्षा आहे. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किंमती घटल्यामुळं हॉटेल, ढाबा तसेच रेस्टॉरंट चालकांना थेट लाभ होणार आहे. तसेच हॉटेलिंग करणाऱ्यांना खिशाचा भार हलका होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती घटल्यास कोट्यावधी जनतेला निश्चितच दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कराला कात्री लावण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती घटल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कराला कात्री लावल्यानंतर उज्ज्वला योजनेच्या सिलिंडर वर 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचे दर 1000 रुपयांवर आहे. केंद्राच्या 200 रुपयांच्या अनुदानाच्या निर्णयानंतर सिलिंडर 800 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भीषण आग; साहित्यामुळे आग पसरण्याची शक्यता