Aadhaar Card | आधारचा चुकीचा वापर कराल तर, आधार द्यायलाही कोणी सापडणार नाही, भरावा लागेल इतक्या  कोटींचा दंड

| Updated on: Aug 31, 2022 | 7:55 PM

Aadhaar Card | आधार कार्डचा चुकूनही चुकीचा वापर करु नका, नाहीतर तुम्हाला मोठा भूर्दंड सहन करावा लागू शकतो.

Aadhaar Card | आधारचा चुकीचा वापर कराल तर, आधार द्यायलाही कोणी सापडणार नाही, भरावा लागेल इतक्या  कोटींचा दंड
आधार कार्डचा गैरवापर नको
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Aadhaar Card | आधार कार्ड हा प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. लहानांपासून मोठ्यापर्यंत आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्डचा वापर जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी करावा लागतो. आधारमार्फतच तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळतो. तेव्हा त्याचा गैरवापर कराल तर आता खबरदार, तुम्हाला हा आर्थिक भूर्दंड पेलवणार बिलकूल पेलवणार नाही. आधार कार्डचा (Aadhaar Card) गैरवापर (Misuse) करणाऱ्यांविरोधात सरकारने (Government) कडक पाऊल उचलले आहे. फसवणुकीसाठी अथवा एखाद्या चुकीच्या कामासाठी आधार कार्डचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण सरकारने त्यासाठी भल्यामोठ्या आर्थिक दंडाची तरतूद (Heavy Penalty Imposed) केली आहे. आधार कार्डचा गैरवापर आता भल्याभल्यांना पेलणार नाही. कारणही तसंच आहे. कारण दंडाची रक्कम ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. आधार कार्डचा गैरवापर केल्यास एक कोटी रुपयांचा दंड (1 Crore Penalty) भरावा लागेल. नवीन कायद्यानुसार थेट एक कोटी रुपायंचा दंड भरावा लागणार आहे.

तर तुरुंगवारी

आधार कार्डमध्ये भारतीय नागरिकाचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि आधार क्रमांक याची माहिती जतन करण्यात येते. व्यक्तीचा बायोमेट्रिक डेटाही आधार कार्डमध्ये असतो. त्याआधारे, या माहितीचा दुरुपयोग करुन गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहे. यासंबंधीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये आधार कार्डचा गैरवापर आणि दुरुपयोग करण्यात आला आहे. मात्र आधार नियमांचे उल्लंघन केल्यास आता नवीन नियमांनुसार, जबर दंडाव्यतिरिक्त तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.

काय सांगतो नियम

केंद्र सरकारने 2 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (दंडाचा निर्णय) नियम, UIDAI ((Adjudication of Penalties) Rules 2021 अधिसूचित केले. यूआयडीएआयचे नियम लागू करणारा कायदा वर्ष 2019 मध्ये मंजूर करण्यात आला आहे.त्यानुसार, प्राधिकरणाला (Unique Identification Authority of India) जर कोणी नियमांचे उल्लंघन करताना, गैरवापर करताना, चुकीच्या उद्देशाने एखाद्याचे नुकसान करताना आढळल्यास, या नियमानुसार, त्याला तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. प्राधिकरणाने नियुक्त केलेला समायोजन अधिकारी याविषयीचा निर्णय घेईल. एखादी संस्था दोषी आढळल्यास त्यावर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

53 शहरात 114 केंद्र

लोकांना आधार कार्डमध्ये सहज दुरुस्ती करता यावी यासाठी UIDAIने देशभरातील 53 शहरात 114 आधार सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आधार सेवा केंद्राची ही सेवा देशातील मेट्रो सिटी, राज्यांची राजधानी, केंद्र शासीत प्रदेशात सुरु करण्यात येणार आहे. सध्या UIDAI कडून देशभरात केवळ 88 केंद्र सुरु आहेत. ही सेवा केंद्र अत्यंत तोकडी असून त्यावर कामाचा अत्यंत भार आहे. या आधार केंद्रांव्यतिरिक्त देशभरात संलग्नीत 35,000 हून अधिक सेवा केंद्रही कार्यरत आहेत. ही सेवा केंद्र बँका, टपाल कार्यालये आणि राज्य सरकारमार्फत चालविण्यात येतात.