मुंबई : आजच्या डिजिटल युगात आपण सर्वजण स्मार्टफोनचा (smartphones) मोठ्या प्रमाणात वापर करीत आहोत. स्मार्टफोनमुळे आपल्या जीवनात अनेक बदल दिसून आले असले तरी, दुसरीकडे स्मार्टफोन वापरताना अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागते. अनेक वेळा लोक तक्रार करतात की त्यांचा स्मार्टफोन चार्जिंगमध्ये ठेवल्याने तो खराब झाला. भारतात असे अनेक स्मार्टफोन युजर्स (Users) आहेत जे चुकीच्या पद्धतीने आपला मोबाईल वापरतात. जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज (Charge) करत असाल तर तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो. स्मार्टफोन चार्ज करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर अशा परिस्थितीत तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होऊ शकतो. या लेखातून स्मार्टफोन चार्ज करण्याच्या योग्य पध्दती समजून घेणार आहोत.
अनेकदा असे दिसून येते, की लोक आपला स्मार्टफोन लवकर चार्ज करण्यासाठी बाजारातून फास्ट चार्जर खरेदी करतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर त्याचे दुष्परिणामदेखील तुम्ही समजून घेतले पाहिजे. फास्ट चार्जर वापरल्याने तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होण्याचा धोका नाकारता येत नाही. तुमचा स्मार्टफोन नेहमी त्याच्यासोबत मिळालेल्या चार्जरनेच चार्ज केला पाहिजे. दुसरीकडे, जर तुमच्या स्मार्टफोनचा चार्जर खराब झाला असेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्याच फोनचा ओरिजिनल चार्जर विकत घेतला पाहिजे.
बर्याच वेळा फास्ट चार्जिंगचा वापर केल्यावर स्मार्टफोन खूप गरम होऊ लागतो. यामुळे, मदरबोर्डच्या शॉर्टसर्किटची शक्यता वाढते. असे केल्याने तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होऊ शकतो किंवा त्याचा स्फोट होऊ शकतो. अशा स्थितीत स्मार्टफोन चार्ज करताना याची विशेष काळजी घेतली पाहिजे. याशिवाय मोबाइल चार्ज करण्यासाठी अनेक यूजर्स पीसी, लॅपटॉपसोबत सी टाइप चार्जर वापरतात. अशी चूक कधीही करू नये. असे केल्याने तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे खराब होऊ शकतो.