नवी दिल्ली : तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (Public Provident Fund-PPF) मध्ये गुंतवणूक करत असाल, तुम्हाला अधिकचा फायदा मिळू शकतो. हा अधिकचा परतावा पदरात पाडून घेण्यासाठी एक युक्ती वापरावी लागते. पीपीएफ हा गुंतवणुकीचा सर्वात मोठा पर्याय आहे. अनेक गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणुकीसाठी अग्रेसर असतात. या योजनेतील गुंतवणुकीवर केंद्र सरकार (Central Government) हमी घेते. या योजनेतील गुंतवणूक E-E-E या श्रेणीत ठेवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेतील गुंतवणूक, व्याज, म्यॅच्युरिटी रक्कम सर्वच करमुक्त (Tax Free) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना भलामोठा फायदा मिळतो. त्यांना चांगला परतावा तर मिळतोच पण कर सवलतीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष फायदा ही मिळविता येतो. ही युक्ती आहे संयमाची, ती कशी वापरायची आणि त्यातून कसा फायदा मिळतो हे पाहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
ही वापरा युक्ती
PPF खात्यातील गुंतवणूक तुम्ही 15 वर्षानंतर 5-5 वर्षांकरिता ही योजना वाढवू शकता. त्यासाठी पीपीएफने काही शर्ते आणि नियम तयार करण्यात आले आहे. ही एक ट्रिक आहे. यामाध्यमातून तुम्ही पुढील दहा वर्षांत अजून जास्त परतावा मिळू शकता. त्यासाठी संयम आणि गुंतवणुकीत सातत्य ठेवावे लागेल. त्यानंतर मुळ रक्कमेवर चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. त्यांना कर सवलत मिळत असल्याने एकाच गुंतवणुकीवर डबल फायदा होतो.
रक्कम व्याजमुक्त
पत्नी, पतीच्या नावे पीपीएफ खाते उघडाल, तेव्हा दोन्ही खाते करमुक्त असतील. परंतु, प्राप्तिकर कायद्याच्या कलम 64 अंतर्गत पत्नीला दिलेली रक्कम अथवा भेट, उत्पन्न करपात्र ठरु शकते. पीपीएफमध्ये मात्र याविषयीची कुठलीही अडचण येत नाही. गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. त्यांना या नियमाचा अडसर येत नाही.
PPF वरील व्याजदर
पीपीएफ खात्यात जोडप्यांना मोठा फायदा मिळतो. जर पती-पत्नीने खाते उघडले तर दोन्ही खाते मिळून मोठी रक्कम जमा होते. सध्या एप्रिल ते जून या तिमाहीत पीपीएफवर 7.1 टक्का व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
कालावधी वाढीचे नियम