नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) ही घर खरेदीसाठी सध्या सर्वाधिक आकर्षित करणाऱ्या शहरांपैकी एक आहे. ग्राहकांची नवी मुंबईमध्ये घर खरेदीची (Real Estate) वाढती आवड पाहता, नवी मुंबईतल्या घरांचे दरही कमालीचे वाढू लागले आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून थंड असलेला रिअल इस्टेटमध्ये 2022 पासून तेजी पाहायला मिळतेय. रेकॉर्डब्रेक बुकिंग नवी मुंबईतील चालू बांधकामांमध्येही केलं जात असल्याचं कळतंय. अशातच वाढलेल्या किंमतींनंतरही ग्राहकांनी नवी मुंबईमध्ये घर खरेदीचं प्रमाण वाढलेलं आहे. लोकांचा प्रतिसाद वाढल्यानंतर आता रिअल इस्टेटमधले नवी मुंबईचे दरही नवे उच्चांक गाठत आहेत. नवी मुंबईच्या उल्वे, द्रोणागिरी, पनवेल (1BHK Rate in Panvel, Ulwe, Dronagiri) या भागातील स्क्वेअर फिटचा दर हा गेल्या दोन ते तीव वर्षात कमालीचा वाढल्याचं आकडेवारीसून पाहायला मिळतंय. 10 टक्के वाढ नवी मुंबईत नोंदवण्यात आली होती. 2022 च्या पहिल्या तीन महिन्यात झालेली ही वाढ पाहता येत्या काळात घर खरेदीचं प्रमाण नवी मुंबईत अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
उल्वे, पनवेल आणि द्रोणागिरी या भागात वेगवेगळे गृहप्रकल्प आकार घेत आहेत. अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत. तर अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. अशातच वाढती कनेक्टीव्हिटी पाहता नवी मुंबईत घर खरेदी करण्यासाठीचा लोकांचा कल वाढतोय. मॅजिकब्रिक्सने केलेल्या अभ्यासानुसार उल्वे, द्रोणागिरी आणि पनवेलमधील सरसरी जागेचा दरही समोर आलाय. ही आकडेवारी पाहता गेल्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबईतील घरांचे दर हे नवे उच्चांक गाठत असल्याचं अधोरेखित झालंय.
नवी मुंबई हे मुंबईच्या तुलनेत फार गजबजलेलं नाही. तुलनेनं शांत शहर असल्याकारणा निवृत्त झालेल्यांची पसंती नवी मुंबईकडे आहे, अस हरीश छेडा यांनी म्हटलंय. हरीश छेडा हे नवी मुंबईतल्या बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. फक्त पनवेल आणि उल्वेच नव्हे तर द्रोणागिरीमध्येही लोकांची पसंती वाढतेय, असाही विश्वाय व्यक्त केला जातो आहे. येत्या काळात MTHL शी द्रोणागिरी जोडलं जाणार असल्यानं ग्राहकांनी द्रोणागिरीचा पर्याय निवडला असावा, असंही सांगितलं जातं.
टाईम्स ऑफ इंडियाच्या अर्पिका भोसले यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, पनवलेमध्ये दर्जेदार शिक्षण संस्था, आरोग्याशी निगडीत सोयी, हॉटेल्स, धार्मिक स्थळं या सगळ्या बाबी अनुकूल आहेत. त्यामुळे पनवेल शहराकडे लोकांचा कल वाढलाय. सोबत उल्वेमध्ये झालेल्या वेगवान विकासानं अनेकांना चकीत केल्यानं तिथेदेखील खरेदीदारांचा उत्साह आहे.
विशेष म्हणजे येत्या काळात या तिन्ही भागातील घरांचे दर अधिक वाढलील, अशीही शक्यता नाकारता येत नाही. सध्यादेखील वाढलेल्या दरात घरखरेची उत्साह कायम असल्यानं रिअल इस्टेट मार्केटला नवी मुंबईत अधिक चांगले दिवस येणार, यात शंका नाही.