Tobacco Cigarette Rules | भावा सिगरेट (Cigarette)पेटावयाची आहे? तंबाखू (Tobacco) मळायची आहे? तर आता कलेजा मोठा करा, जिगरा मोठा ठेवा. कारण आता नवीन नियमांशी (New Rules) तुमचा सामना होणार आहे. आतापर्यंत उत्पादनावर वारंवार इशारा देऊन ही काहीच उपयोग झाला नाही. इशारा ही ठळक आणि स्पष्ट देण्यात आला आहे. पण आपल्यावर काही परिणाम झाला आहे का? आपण तर जीवावर उदार झालो आहोत. असे अनेक इशारे देऊन, किंमती वाढवून ही काहीच उपयोग होताना दिसत नाही. एवढेच नाही तर दुरचित्रवाणीवर प्रत्येक चित्रपटादरम्यान हा वैधानिक इशारा देणाऱ्या अनेक जाहिरातींना मनोरंजन म्हणून तू पाहिलेयस ना भावा. तर मग आता तुला धडा शिकवण्यासाठी (Teach a lesson) सरकारने (Central Government) दुसरं पाऊल टाकलं आहे. पुढील वेळी तुम्ही तंबाखू किंवा तंबाखूशी संबंधित उत्पादने खरेदी करण्यासाठी दुकानात जाल, तेव्हा उत्पादनांवर (Tobacco Production) लिहिलेले इशारे खूप कडक असतील आणि तुम्हाला धक्का बसतील. अशा स्थितीत अजूनही तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी तुम्हाला दहादा विचार करावा लागेल. सरकारने इशाऱ्याच्या नियमात बदल केला असून, त्यात इशाऱ्याची भाषा आणि चित्र याबाबतचे नियम कडक करण्यात आले असून, नवीन नियम यंदा 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकवर इशारा आणि नवीन चित्राबाबत अधिसूचना (Notification) जारी केली आहे. कर्करोगासारख्या (Cancer) घातक आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यापासून लोकांना वाचवण्यासाठी सरकार जनजागृतीवर भर देत आहे. त्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नियमांनुसार, पॅकवर ‘तंबाखूमुळे वेदनादायक मृत्यू होतो’ असा इशारा लिहण्यात येणार आहे. 22 डिसेंबर 2022 पासून तुम्हाला थेट मृत्यूचा संदेश देण्यात येणार आहे. हा नियम पुढील एक वर्षासाठी लागू असेल. म्हणजेच 1 डिसेंबर 2022 नंतर उत्पादित, आयात केलेल्या किंवा पॅकेज केलेल्या उत्पादनांना हा नियम लागू होईल. दुसरीकडे, 1 डिसेंबर 2023 नंतर उत्पादित, आयात केलेल्या किंवा पॅकेज केलेल्या उत्पादनांना “तंबाखू सेवन करणाऱ्यांचा तरुण वयात मृत्यू होतो” असा इशारा असेल. या सूचनांचे उल्लंघन हा दंडनीय गुन्हा असेल, असे सरकारने स्पष्ट केले. जे तुरुंगवास किंवा दंडास पात्र ठरेल.
भारतातील अनेक उत्पादनांमध्ये इशारा देण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. अशी सर्व उत्पादने ज्यांच्यामुळे ग्राहकाला कोणतेही नुकसान होऊ शकते, त्यांना चेतावणी दिली जाते. या चेतावणीचा उद्देश विशिष्ट उत्पादनाशी संबंधित जोखमींबद्दल माहिती प्रदान करणे आहे. कोणत्याही व्यक्तीला अनवधानाने या उत्पादनांचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे आणि उत्पादन खरेदी करताना, त्याला त्याचे नुकसान काय आहे ही आगाऊ माहिती द्यावी असे नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुमचा मृत्यू ओढावू शकतो, हे वाक्य वाचण्यासाठी तयार रहा.