सोनं खरेदीदारांसाठी उद्या ‘बंपर धमाका ’ जाणून घ्या नवी योजना

| Updated on: Feb 27, 2022 | 2:21 PM

सॉवरेन गोल्ड बाँड योजना 2015 मध्ये सुरू झाली असून या योजनेतून सरकारने आतापर्यंत 32 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे. पेपर गोल्ड (SGB) मध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे.

सोनं खरेदीदारांसाठी उद्या ‘बंपर धमाका ’ जाणून घ्या नवी योजना
जाणून घ्या आजचे सोन्याचे दर
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई‘सॉवरेन गोल्ड बाँड’(Sovereign gold bond) योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना पुन्हा एकदा वाजवी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजना 2021-22 चा पुढील टप्पा 28 फेब्रुवारीपासून ‘सबस्क्रिप्शन’साठी खुला करण्यात येत आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजना 5 दिवसांसाठी पुन्हा सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने त्याची किंमत 5,109 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली असून तुम्ही यामध्ये 4 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बाँड योजने​​मध्ये गुंतवणूक (Investment) करणे हा एक चांगला आणि कमी व्यस्त पर्याय समजला होतो. सॉवरेन गोल्ड बाँड​द्वारे फिजिकल गोल्डपासून ते डिजिटल किंवा पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक हस्तांतरित करणे हे सरकारसाठी एक मोठे यश आहे. या योजनेच्या सुरुवातीलाच म्हणजेच 2015 मध्ये स्थापनेपासून 32,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी सरकारने या माध्यमातून उभारला आहे. स्टोरेज खर्च नसल्याने पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला आणि कमी व्यस्त पर्याय आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीत केवळ शुल्क आकारले जात असल्याची माहिती देण्यात आली.

ऑनलाइन पेमेंटवर सूट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी भारत सरकाने चर्चा करून, ऑनलाइन अर्ज करणार्‍या गुंतवणूकदारांना, अर्जाचे पेमेंट डिजिटल पद्धतीने केले असल्यास, त्यांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, अशा गुंतवणूकदारांसाठी, गोल्ड बाँडची इश्यू किंमत 5,059 रुपये प्रतिग्रॅम असेल. बॉण्ड्स 1 ग्रॅमच्या मूळ युनिटसह सोन्याच्या ग्रॅमच्या पटीत नामांकित
केले जातात. बाँड 8 वर्षांच्या कालावधीसाठी असेल आणि 5 व्या वर्षानंतर एक्झिट पर्यायासह पुढील व्याज भरण्याच्या मुदतीवर वापरला जाईल.

आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम

आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोन्याच्या दरात तेजी बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये वाद सुरु असल्याने याचा परिणाम सोन्याच्या किमतीवरदेखील होत आहे. याचाच परिणाम म्हणून सोन्यानं वर्षभराहून अधिकचा उच्चांक गाठला आहे. युक्रेनमधील परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. तेलाच्या किमती वाढल्याने ‘आयएनआर’वर दबाव पडतो, ज्यामुळे सोने अधिक महाग होते. येणारा कालावधीदेखील सोन्याच्या दरांसाठी चढउताराचा असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किती सोने खरेदी करू शकता

सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकते. तर HUF 4 किलोपर्यंतचे सोने रोखे आणि 20 किलोपर्यंतचे ट्रस्ट खरेदी करू शकते. सॉवरेन गोल्ड बाँडच्या गुंतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याज सहामाही आधारावर उपलब्ध असेल. ‘रिडम्पशन’वर कोणताही भांडवली लाभ कर आकारला जाणार नाही.

संबंधित बातम्या :

इशान किशनपाठोपाठ स्मृती मानधनाच्याही डोक्यावर बॉल आदळला! रिटायर्ड हर्ट होऊन माघारी

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडून दुजाभाव; भुजबळांचा आरोप, राणेंबद्दल म्हणाले…

Nashik | पोस्ट व्हायरल करायची अन्…शेलारांनी सांगितले ठाकरे सरकारचे टूलकिट