Rule Change | आजपासून होणार हे बदल, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर काय होणार परिणाम?

| Updated on: Sep 01, 2022 | 11:31 AM

Rule Change | 1 सप्टेंबरपासून बँकिंग, शेती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे बदल घडतील. पीएम किसान योजनेसंबंधीच्या पेमेंटसंदर्भात तुम्ही नियमांची पुर्तता केली नसल्यास आता तुम्हाला अडचण येऊ शकते.

Rule Change | आजपासून होणार हे बदल, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर काय होणार परिणाम?
बदलांचा होणार परिणाम
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Rule Change | आज 1 सप्टेंबर (September Month)रोजी महिन्याच्या पहिल्या दिवशी नियमातील काही बदल शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणार आहेत. पगारदार(Salaried), शेतकरी (Farmer) आणि सर्वसामान्यांच्या (Common Man) आयुष्यात 1 सप्टेंबरपासून कही खुशी कही गमचे वातावरण राहिल. घरगुती गॅसच्या दरवाढीचा निर्णय प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घेण्यात येतो. काही बँकांचे नियम (Banking Rules) बदलणार आहेत. पीएम किसान योजनेतील (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांनी अटींची पुर्तता केली नसेल तर त्यांना योजनेतील रक्कम काढताना आता अडचण येऊ शकते. सप्टेंबर महिन्यांत सणांमुळे काही दिवस बँका बंद राहणार आहेत. याकाळात तुम्ही बँकेसंबधीचे कामकाज करु शकणार नाही.  त्यामुळे तुमच्याशी संबंधीत काही क्षेत्रात बदल होत असेल तर तो लक्षात घ्या आणि ते काम त्वरीत उरकून घ्या.

PNB KYC Updates

पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी केवायसी (Know Your Customers) अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने यासंबंधीचे कडक धोरण यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार, ग्राहकांना पुरेसा अवधी देण्यात आला आहे. 31 ऑगस्टपूर्वी ग्राहकांनी त्यांचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. बँकेने ट्विट करुन याविषयीची सूचना ग्राहकांना दिली आहे. तसेच ग्राहकांना एसएमएसही पाठवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येईल. केवायसी अद्ययावत न करणाऱ्या ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर खात्यातील व्यवहार करता येणार नाही.

घरगुती गॅसेच्या किंमती

दर महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम कंपन्या घरगुती गॅसच्या किंमतीत बदल करतात. सातत्याने दरवाढ सुरु असले तरी घरगुती गॅसच्या किंमतीत ग्राहकांना कसलाही दिलासा मिळाला नाही. दर वाढले नाहीत. पण कमीही झाले नाहीत. पण व्यावसायीक कारणांसाठी गॅसचा वापर करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारने जवळपास 100 रुपयांनी किंमतीत कपात केली आहे. इंडेनच्या 19 किलो व्यावसायिक सिलिंडर किंमतीत दिल्लीत 91.50 रुपये, कोलकत्त्यात 100 रुपये, मुंबईत 92.50 रुपये, चेन्नईत 96 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पीएम किसान योजना

प्रधानमंत्री किसान योजनेत निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 निश्चित केली होती. जर 31 ऑगस्टपर्यंत या अटीची पूर्तता केली नसेल तर शेतकऱ्यांचा पुढील हप्ता अटकू शकतो.

विमा एजंटचे कमीशन कमी

IRDAI ने जनरल इन्शुरन्समधील नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार, एजंटच्या कमीशनमध्ये कपात करण्यात आली आहे. आता 30 ते 35 टक्क्यांऐवजी एजंटला 20 टक्के कमिशन मिळणार आहे. परिणामी ग्राहकांना आता विमा स्वस्त मिळेल आणि या व्यवसायाची व्याप्ती ही वाढेल.