आता मुलं सुद्धा वापरु शकतील तुमचा UPI; करु शकतील पेमेंट, काय आहे नवीन फीचर, कसा होईल वापर

| Updated on: Aug 16, 2024 | 11:31 AM

UPI Payments : राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) युपीआय ॲपवर एक नवीन फीचर लाँच केले आहे. याआधारे युझर्स त्यांचे युपीआय खाते दुसऱ्या सोबत शेअर करु शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत ते शेअर करता येईल. कसे काम करते हे फीचर जाणून घ्या..

आता मुलं सुद्धा वापरु शकतील तुमचा UPI; करु शकतील पेमेंट, काय आहे नवीन फीचर, कसा होईल वापर
युपीआयचे जोरदार फीचर
Follow us on

राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आणले आहे. यामध्ये युझर्स त्या्चे युपीआय खाते दुसऱ्यासोबत शे्र करु शकतो. ‘UPI सर्कल डेलिगेट पेमेंट्स’ नावाने हे फीचर आणण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने मुख्य खातेधारक दुसऱ्या वापरकर्त्याला, युझर्सला व्यवहार करण्याचा अधिकार देतो.

काय आहे या फीचरमध्ये खास?

इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, UPI सर्कल डेलिगेट पेमेंट्स (UPI Circle-Delegate Payments) एक खास फीचर आहे. त्यानुसार युपीआय खात्याचा सर्व वापर, परवानगी, अधिकार हे मुख्य वापरकर्त्याकडे असतील. मास्टर एक्सेस खातेधारकाकडे असेल. हा खातेधारक व्यवहारासाठी त्याचा अधिकार इतराला देता येईल. बँक ऑफ बडोदाचे डिजिटल बँकिंगचे मुख्य व्यवस्थापक के. वी. शीतल यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, युझर्स त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला, जवळच्या नातेवाईकाला युपीआय व्यवहार अधिकार शेअर करु शकतील. त्याआधारे दोन व्यक्ती एकाच बँक खात्याचा वापर करु शकतील.

हे सुद्धा वाचा

कसे काम करेल हे फीचर?

प्राईम्स पार्टनर्सचे एमडी श्रवण शेट्टी यांच्या मते मुख्य युपीआय वापरकर्ता हा त्याच्या सदसदविवेकबुद्धिनुसार किती अधिकार द्यायचे हे ठरवू शकतो, तो एकतर पूर्ण अधिकार देऊ शकतो, अथवा काही प्रमाणात अधिकार देऊ शकतो. त्याआधारे दुसऱ्या वापरकर्त्याला मुख्य खात्यातून रक्कम हस्तांतरण करण्याचा अधिकार मिळतो. तो थेट पेमेंट करु शकतो. पण दुसऱ्या व्यक्तीला प्रत्येक व्यवहारावेळी मुख्य वापरकर्त्याला व्यवहाराची विनंती करावी लागेल, त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. मुख्य खातेधारक हा दुसर्‍या खातेधारकासाठी व्यवहाराची मर्यादा निश्चित करु शकतो. NPCI नुसार, जास्तीत जास्त मासिक 15,000 रुपयांची मर्यादा आहे.

काय होईल फायदा

घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, गृहिणींसाठी, नोकरदारांसाठी युपीआयची ही सेवा महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे व्यहारात पारदर्शकता राहील. मुलं कुठं आणि किती खर्च करतो यावर लक्ष ठेवता येईल. आई-वडिलांचा पण मुलांच्या खर्चावर नियंत्रण असेल. त्यांच्या खर्चाची चाचपणी करता येईल. तर विद्यार्थ्यांना बाहेरगावी असताना पण सहज आणि सुलभ व्यवहार करता येईल. त्यांना प्रत्येकवेळी एटीएमवर जाऊन पैसे काढण्याची गरज राहणार नाही.