मुंबई : कोविड कालावधीत, सुमारे 2 महिन्यांपूर्वी ट्रेनमध्ये बंद केलेली बेडरोल सुविधा पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर एसी कोचमध्ये बेडरोल उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू झाली. मात्र तरीही ही सुविधा सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध (Available in all trains) करून देण्यात आलेली नाही, त्यामुळे रेल्वे प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, ट्रेन बुक केल्यानंतर, ज्या ट्रेनमध्ये प्रवास (Travel by train) करायचा आहे त्या ट्रेनमध्ये बेडरोलची सुविधा आहे की नाही हे कळत नाही. पण IRCTC ने आता, ही समस्या सोडवली आहे. ज्याद्वारे तुम्ही कोणत्या ट्रेनमध्ये प्रवास करणार आहात हे कळू शकते. त्यात बेडरोलची सोय (Bedroll facility)आहे की नाही? याबाबतची माहिती तुम्हाला मिळणार आहे. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱया महिलांना आता, आपल्याच सीटला लागून, मुलांसाठी एका छोट्या बेडच्या आकाराची सीट जोडून देण्यात येईल. यामुळे महिलांना लहान मुलांना घेऊन प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.
Facilitating ease of travel for mothers travelling with their babies.
Indian Railways introduced baby berth on experimental basis in Lucknow Mail 12229/30, Coach No. 194129/B4, berth No. 12 & 60.
The fitted baby berth is foldable & secured with a stopper. pic.twitter.com/THZvL4MJhk— Ministry of Railways (@RailMinIndia) May 10, 2022
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एसी डब्यांमधून पडदेही काढण्यात आले आणि प्रवाशांना देण्यात येणाऱया ब्लॅकेंटची सुविधाही बंद करण्यात आली. मात्र, कोविडची तिसरी लाट संपताच रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांच्या एसी डब्यांमध्ये पडदे लावण्यास सुरुवात केली आहे आणि बेडरोलची सुविधाही सुरू केली आहे, मात्र तरीही ही सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही.
तिकीट बुक केल्यानंतर, IRCTC तुमच्या मोबाईल नंबरवर एक लिंक पाठवते. ज्याद्वारे तुम्ही प्रवास करणार असलेल्या ट्रेनमध्ये बेडरोल आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. रेल्वेने आतापर्यंत ९५० हून अधिक गाड्यांमध्ये बेडरोल सुविधा पुनर्संचयित केली आहे.
Video : आता रेल्वेमध्ये लहान बाळाला घेऊन सहजरित्या करा प्रवास, रेल्वेकडून आई आणि बाळासाठी खास बर्थची व्यवस्था@RailMinIndia #Railways #babybirth #RailwayMinistry
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा : https://t.co/PXbmIaGu10 pic.twitter.com/DTDFLORJjY
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 10, 2022
भारतीय रेल्वेच्या वेबसाईडवर क्लिक करून, तुम्ही प्रवास करण्यापूर्वी जाणून घेऊ शकता की तुम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करणार आहात त्या ट्रेनमध्ये किती वेळ बेडरोल सुविधा उपलब्ध आहे. वेबसाईडवर वर क्लिक केल्यानंतर open चा पर्याय येईल. तुम्ही ते उघडा आणि संपूर्ण तपशील तुमच्या स्क्रीनवर फक्त एका क्लिकवर येईल.