नवी दिल्ली : आता दर महिन्याला देशाला दोन-दोन वंदेभारत एक्सप्रेस मिळणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात या ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. चौथ्या वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Train) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखवला. आता देशभरात या एक्सप्रेसचा बोलबाला राहणार आहे.
पुढील वर्षापर्यंत रेल्वे विभाग एकूण 75 वंदे भारत एक्सप्रेस चालविणार आहे. कोविडमुळे या योजनेला थोडा ब्रेक लागला होता. परंतु, आता रेल्वे मंत्रालय दर महिन्याला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालविणार आहे.
रेल्वे बोर्डाने 14 दिवसांच्या आत दुसरी रेल्वे सुरु केली आहे. वंदे भारत ट्रेन सुरु करण्याचा हा कार्यक्रम येत्या वर्षभर राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सफर करण्याची लवकरच संधी मिळेल.
या 30 सप्टेंबर रोजी गांधीनगर पासून मुंबईपर्यंत पहिल्यांदा वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने पहिल्या आणि दुसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा तिसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सातत्याने सोयी-सुविधा वाढविण्यात येत असल्याने नवीन रेल्वे मार्गावर धावण्यासाठी नवीन रेल्वेला बराच कालावधी लागत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून दोन-दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे मार्गावर धावत आहेत.
भारतीय रेल्वे 15 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत पहिल्या एका वर्षात 75 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ट्रॅकवर उतरविणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रानुसार, नवीन रेल्वे सुरु झाल्यानंतर 71 वंदे भारत एक्सप्रेसचे उत्पादन सुरु होणार आहे.
या रेल्वेत प्रवाशांना विमानासारख्या सुविधा देण्यात येणार आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सोयी-सुविधा वाढविण्यात येणार आहे. ही रेल्वे 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडणार आहे.