Income Tax : बोला आता, तुम्हाला तर काहीच माहिती नाही, करदात्यांना मिळणार 41104 रुपये!

| Updated on: Mar 25, 2023 | 5:48 PM

Income Tax : तुम्हाला माहिती होते का, की अंकेक्षण, ऑडिट करणाऱ्यांना लॉटरी लागणार आहे ते म्हणून. तर करदात्यांना 41104 रुपये मिळणार आहे. नेमकं काय आहे हे अविश्वसनीय प्रकरण..

Income Tax : बोला आता, तुम्हाला तर काहीच माहिती नाही, करदात्यांना मिळणार 41104 रुपये!
सावध रहा
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्ही पण यावेळी आयटीआर फाईल (ITR Filing) केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही आयटीआर अद्याप फाईल केला नसेल तरी पण या माहितीने तुम्ही अपडेट व्हाल. सध्या आयटीआर भरण्याची लगबग सुरु आहे. अनेक जण कामाच्या व्यस्तेतून, वेळात वेळ काढून त्यांची आर्थिक कुंडली जुळविण्यात व्यस्त आहेत. केंद्र सरकारने जुनी कर पद्धत (Old Tax Regime) आणि नवीन कर पद्धत (New Tax Regime) . जुन्या कर पद्धतीत आयकरदात्याला करपात्र उत्पन्नावर कर सवलतीची संधी मिळते. करदात्यांनी वेळीच आयटीआर दाखल केला नाहीतर त्याला संधी देण्यात येते.

तुम्हाला आला का ई-मेल

1 एप्रिल 2023 रोजीपासून आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या कालावधीत तुम्हाला तुमचे जुने प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return-ITR) दाखल करता येतील. अनेक करदात्यांना त्यांच्या ई-मेल आयडीवर एक मेल आला आहे. असा ई-मेल तुम्हाला पण आला असेल, नाही तर तो येण्याची शक्यता आहे. या ई-मेलमध्ये दावा करण्यात आला आहे की, करदात्याला 41104 रुपये रिटर्न मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्क्रीन शॉट झाला व्हायरल

ई-मेल असा पाठवण्यात आला आहे की, पहिल्या नजरेत असे वाटते की, हा ई-मेल आयकर विभागाने (Income Tax Deptt) पाठविला आहे. पण हा मॅसेज, संदेश पूर्णपणे फेक, बनावट आहे. या ई-मेलचा स्क्रीन शॉट सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे देशभरातील करदात्यांना विश्वासच बसत नाहीये. काहींना तर हा ई-मेल खरा असल्याचे वाटते.

ई-मेलमध्ये काय आहे माहिती

या मेलमध्ये एक दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, आयकर विभागाने खात्याचे ऑडिट पूर्ण केले आहे. तुम्ही आता
41,104.22 रुपये मिळण्यास पात्र ठरला आहात. पण तुम्ही दिलेली एक माहिती अत्यंत चुकीची आहे. या चुकीमुळे तुम्हाला या रक्कमेवर पाणी सोडावे लागू शकते. त्यासाठी नियमानुसार, अर्ज सादर करा. या ईमेलमध्ये सर्वात खाली हा ई-मेल उपायुक्त, आयकर विभाग यांनी पाठविल्याचे भासविण्यात आले आहे.

या जाळ्यात बिलकूल अडकू नका

या ई-मेल पूर्णपणे फेक, बनावट आहे. सायबर भामट्यांनी करदात्यांना फसवण्यासाठी हे जाळे टाकले आहे. ते सावजाची वाट पाहत आहेत. त्यामुळे तुम्ही सावध रहा, त्यांचे सावज होऊ नका. या ई-मेलचा पत्र सूचना कार्यालयाने पडताळा (PIB Fact Check) केला. त्यामध्ये हा मॅसेज पूर्णतः खोटा असल्याचे सिद्ध झाले. या मेलमध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे यामुळे सिद्ध झाले. webmanager@incometax.gov.in​​​​​​​​​​​​​​​​​​ या ईमेलवरुन हा मॅसेज पाठविण्यात आला आहे.

अडकू नका, फॉरवर्ड करु नका

‘पीआईबी फॅक्ट चेक’ (PIB Fact Check) ने हा संदेश कोणालाच फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे. सायबर भामट्यांच्या, गुन्हेगारांच्या जाळ्यात कोणीही अडकू नका आणि हा संदेश पुढे कोणालाही पाठवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने असा कोणताही संदेश पाठविला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.