नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जर तुम्हाला ही आयुष्याच्या संध्याकाळी मोठी निवृत्ती रक्कम (Pension News Update) हवी असेल तर याहून दुसरी चांगली संधी नाही. केंद्र सरकार पेन्शनविषयी धोरण आखते आणि वेळोवेळी याविषयीची माहिती देत असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सोमवारी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, कर्मचारी पेन्शन योजनेतंर्गत (EPS) कर्मचाऱ्याला अधिकची पेन्शन मिळविता येऊ शकते. त्यासाठी त्याला अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल . निवृत्ती निधीचा कारभार पाहणाऱ्या ईपीएफओने सदस्य आणि नियोक्ता यांना संयुक्तपणे अर्ज करण्यास सांगितले आहे.
नोव्हेंबर, 2022 मध्ये हायकोर्टाने कर्मचारी पेन्शन योजना, 2014 कायम ठेवली होती. त्यापूर्वी 22 ऑगस्ट, 2014 मध्ये ईपीएस सुधारणा करुन पेन्शन योग्य पगाराची मर्यादा 6,500 रुपये प्रति महिन्याऐवजी 15,000 रुपये प्रति महिना इतकी वाढवली. तर सदस्य आणि नियोक्त्यांना ईपीएसमध्ये पगाराच्या 8.33 टक्के योगदान देण्याची परवानगी दिली होती.
ईपीएफओने याविषयीचे कार्यालयीन आदेश काढले आहेत. त्यांनी विभागीय कार्यालयांना याविषयीची माहिती पाठवली आहे. त्यामध्ये संयुक्त पर्यायी अर्जाबद्दल माहिती देण्यात आली आहे. ईपीएफओने विभागीय कार्यालयांना याविषयीची माहिती दिली. लवकरच याविषयीचे पत्रक देण्यात येणार आहे आणि युनिक रिसोर्स लोकेशनची माहिती देण्यात येईल.
कर्मचारी आणि नियोक्ता यांच्याकडून आलेल्या अर्जाची नोंदणी करण्यात येईल. डिजिटल रुपात लॉगइन करण्यात येईल. अर्जदाराला नोंदणी क्रमांक देण्यात येईल. विभागीय कार्यालयातील अधिकारी या अर्जाची छाननी आणि पडताळणी करतील. त्यानंतर अर्जदाराला ई-मेल, एसएमएस अथवा टपालाने पुढील प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
कष्टकरी आणि मजूर वर्गासाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) फायदेशीर आहे. दरमहा त्यांच्या खात्यातून एक ठराविक रक्कम निवृत्ती योजनेसाठी वळती होते. ही योजना निवृत्तीसाठी स्वेच्छेने बचत करण्यास प्रोत्साहन देते. भविष्यात खर्च भागविण्यासाठी या योजनेत रक्कम जमा करता येते.
अटल पेन्शन योजना ही एक सामाजाकी सुरक्षा योजना आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी या योजनेत एक छोटी रक्कम कपात होते. योगदान राशी दरमहा जमा करण्यात येते. या योजनेमुळे भविष्य सुरक्षिततेची हमी मिळते. उतारवयात खर्चासाठी एक ठराविक रक्कम मिळते.
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 60 व्या वर्षानंतर ग्राहकाला मासिक पेन्शनचा लाभ मिळतो. ही पेन्शन रक्कम 1,000 रुपये ते 5,000 रुपये प्रति महिना या दरम्यान असते. तुम्ही जेवढी रक्कम आता गुंतवणूक कराल, तेवढी पेन्शन जास्त मिळते. तुम्ही पेन्शनमधील गुंतवणूक भविष्यात वाढवूही शकता. त्यासाठी अर्ज करावा लागतो.