मुंबई : आपण जण ट्रेनचा ( TRAIN ) प्रवास करत असाल आणि जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर आपल्यासाठी ही चांगली बातमी आहे. आता आपल्या ट्रेनच्या प्रवासात आपला पीएनआर ( PNR ) नंबरचा वापर करून थेट आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरून जेवणाची ऑर्डर देता येणार आहे. रेल्वेमंत्रालयाने जारी केलेल्या एका स्टेटमेंटनूसार रेल्वे प्रवाशांसाठी ( RAILWAYPASSENGER ) ही सोय अलिकडे सुरु करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना ई- कॅटरींग सर्व्हीस मार्फत जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप सर्व्हीस सुरू केली आहे. यासाठी रेल्वे प्रवासी व्हॉट्सअप क्रमांक +91-8750001323 याचा वापर करू शकता.
असा करता येणार वापर
रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने ( IRCTC ) सुरूवातीला ही ई- कॅटरींग सेवा दोन टप्प्यात सुरू केली आहे. पहील्या टप्प्यात ई – तिकीट बुक करताना आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरून www.ecatering.irctc.co.in वर क्लीक केल्यास ई- कॅटरींग सेवा निवडण्यासाठी एक संदेश येईल. त्यानंतर ग्राहक आयआरसीटीसीच्या कॅटरींग वेबसाईटने सरळ स्थानकांवर उवलब्ध आपल्या पसंतीच्या रेस्टॉरंटचे जेवण एप डाऊनलोड न करता ऑर्डर करू शकणार आहे.
AI चॅटबोट करणार तुमचे जेवण बुक
सर्व्हीसच्या दुसऱ्या टप्प्यात ग्राहकांना इंटरॅक्टीवे टू वे कम्युनिकेशनसाठी तु्म्हाला व्हॉट्सअप क्रमांक दिला जाईल. ज्यात AI चॅटबोट ई- कॅटरींगद्वारे प्रवाशांच्या मागण्या ऐकून त्याद्वारे जेवण बुक केले जाईल.
सध्या काही मोजक्या ट्रेनमध्येच सेवा
सुरूवातीला प्रवाशांची प्रतिक्रीया आणि सल्ल्यानूसार काही निवडक गाड्यांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल, नंतर तिला दुसऱ्या गाड्यांमध्येही ही सेवा सुरू केली जाईल. सध्या आयआरसीटीसी मोबाईल ऐप आणि वेबसाईटद्वारे ई – कॅटरींग सर्व्हीसच्या मदतीने प्रवाशांना एका दिवसात सुमारे पन्नास हजार जेवणांची ऑर्डर बुक केली जात आहे.