नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : आता ग्रामीण भागात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पण रेल्वेतील आसन आरक्षण, विमान तिकीटे, लांबपल्ल्याच्या एसटी बस, ट्रॅव्हल्सचे आरक्षण होत नाही. मोबाईलमुळे काही जण ऑनलाईन आरक्षण करतात. पण हा टक्का तसा कमीच आहे. ग्रामीण भागात ठराविक बाजार गावात, तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्याच ठिकाणी विमान अथवा रेल्वे आसान आरक्षित करण्याची सुविधा मिळते. पण आता केंद्र सरकारने ग्रामीण भागात सुद्धा सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निश्चिय केला आहे. त्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (Common Service Centre) सुरु करण्यात येणार आहे. यामाध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध तर होईलच. पण ग्रामीण भागात शासकीय योजनांचा पण लाभ पोहचवणे सोपे होईल.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार मदत करत आहे. देशातील प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य सेवा केंद्र सुरु करण्यात येईल. 17,176 प्राथमिक कृषी पतसंस्था आहे. त्यातून ही सुविधा देण्यात येईल.
या मिळतील सुविधा
या सेवा केंद्रातून ग्रामीण भागातील जनतेला बँकिंग, विमा, आधारसह इतर 300 पेक्षा अधिक सेवा मिळतील. या सेवा किफायतशीर दरात उपलब्ध होईल. गरिब जनतेला त्याचा फायदा होईल. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी या सेवाचे उद्धघाटन केले.
छोटी केंद्र गावागावात
17,176 प्राथमिक कृषी पतसंस्था सामान्य सेवा केंद्र चालवतील. तर त्यांच्या अंतर्गत पॅक्स केंद्र असतील. देशभरात सध्या 95,000 पॅक्स आहेत. यातील 6,670 पॅक्सने सीएससी रुपाने कामाला सुरुवात पण केली आहे. येत्या पंधरा दिवसात ही संख्या झपाट्याने वाढणार आहे.
14 हजार तरुणांच्या हाताला काम
या सामान्य सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल. 17,176 प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून सध्या 14 हजार तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. या तरुणांना ग्रामीण स्तरावरच कमाई करता येईल.
विमानाचे तिकीटही मिळेल
केंद्र सरकार सामान्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून लवकरच रेल्वे आरक्षण सेवा सुरु करणार आहे. विमान तिकीटही ग्रामीण भागातच खरेदी करता येतील. केंद्रीय सहकार मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालय, नाबार्ड आणि ई-गव्हर्नस सर्व्हिसेज इंडिया यांनी यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे.
नागरिकांना 300 सेवा
पॅक्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला अनेस सोयी-सुविधा मिळतील. डिजिटल सेवा पोर्टलवर अनेक सुविधा मिळतील. यामध्ये बँकिंग, विमा, आधार, कृषी, कृषी उपकरण, पॅन कार्ड, आयआरसीटीसी, रेल्वे, बस, विमान तिकीट अशा 300 सेवांचा लाभ घेता येईल.