तुम्हीही एलआयसीचे ग्राहक (LIC Customer) असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. एलआयसीने जुन्या ग्राहकांसाठी पुन्हा या कंपनीशी जोडण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. तुमची पॉलिसी बंद पडली असेल, खंडित झाली असेल, व्यपगत (Lapsed) झाली असेल तर विमा पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची ही शेवटची संधी सोडू नका. कारण उद्या ही संधी कदाचित ग्राहकासाठी उपलब्ध नसेल. जे ग्राहक काही कारणास्तव प्रीमियम (LIC Primuium) भरू शकले नाहीत आणि त्यांची पॉलिसी खंडित झाली आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. व्यपगत झालेली विमा पॉलिसी स्वस्तात पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाने विशेष मोहीम सुरू केली आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू झालेली एलआयसीची मोहीम येत्या 25 मार्चला संपणार आहे. एलआयसीच्या पॉलिसीधारकांना त्यांची पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी आता काही तास शिल्लक आहेत. आयुर्विमा पुनर्संचयित करण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही निश्चितच एक उत्तम संधी आहे.
प्रीमियम पेइंग टर्म दरम्यान ज्या पॉलिसी खंडित झाल्या आणि पॉलिसीची मुदत पूर्ण झाली नाही, अशा पॉलिसी पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात. त्यासाठी दंड भरावा लागेल आणि पॉलिसी लगेच सुरू होईल. एलआयसीने यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून, 7 फेब्रुवारीपासून सुरू असून 25 मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. ज्यांना या मोहिमेचा लाभ घ्यावा लागेल, त्यांना 25 मार्चपर्यंत उशिरा दंड भरून पॉलिसी सुरू करावी लागणार आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता, एकूण भरलेल्या प्रीमियमच्या आधारे मुदत विम्यासाठी आणि उच्च-जोखमीच्या योजनेव्यतिरिक्त इतर कालावधीसाठी विलंब शुल्कात सवलत दिली जात आहे. वैद्यकीय गरजांमध्ये सवलत नाही. आरोग्य विमा आणि विमा योजनांसाठी विलंब शुल्कही शिथिल केले जात आहे. मायक्रो इन्शुरन्स प्लॅनवर एलआयसीकडून विलंब शुल्क आकारून ही सवलत दिली जात आहे.
एलआयसी प्रीमियम पेमेंटसाठी लेट फीमध्ये 1 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत 20 टक्के सवलत देण्यात येत आहे. अर्थात जास्तीत जास्त 2 हजार रुपयांची सवलत ग्राहकांना पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी मिळेल. एलआयसी प्रीमियम पेमेंटवर 1 लाख ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान विलंब शुल्क 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 2,500 रुपये सवलत देण्याची मुभा आहे. एलआयसी प्रीमियम पेमेंट तीन लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विलंब शुल्कासाठी जास्तीत जास्त 30 टक्के किंवा 3,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
ज्या पॉलिसी हप्त्याअभावी खंडित झाल्या आहेत आणि ज्यांचे नूतनीकरण करता येऊ शकते. अशा पॉलिसींचा या मोहिमेत समावेश होणार आहे. कोविडची परिस्थिती पाहता ग्राहकांसाठी एलआयसीने ही खास संधी उपलब्ध करून दिली आहे. आर्थिक परिस्थिती बिघडल्याने लोकांनी प्रीमियम भरणे बंद केल्याने त्यांची विमा पॉलिसी बंद झाली होती. प्रतिकूल परिस्थितीत अशा ग्राहकांच्या कुटुंबीयांना पुन्हा आधार मिळावा आणि ज्या विशिष्ट कालावधीसाठी सदर पॉलिसी काढण्यात आली, तोपर्यंत तिचे हप्ते भरता यावे यासाठी ग्राहकांना हा मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.